Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सध्याचे मुख्यमंत्री आता काय चाटतात? गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना राऊत यांची जीभ घसरली

Amit Shah : निवडणूक आयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती

सध्याचे मुख्यमंत्री आता काय चाटतात? गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना राऊत यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. शनिवारी पुण्यात (Pune) मोदी@20 या पुस्तकाचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते झाले. केंद्रीय निवडणूक आयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. यासोबतच धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला बहाल केले आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी विरोधकांचे तळवे चाटले असे अमित शाह म्हणाले होते.

काय म्हणाले होते अमित शाह?

कालच एक मोठा विजय आमच्या युतीला मिळाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत. जी लोकं खोटेपणाच्या आधारावर हुंकार भरत होते त्यांना आज माहित पडलं की, सत्य कोणासोबत आहे. 2019 च्या निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष होतो. निवडणूक आम्ही युतीत लढलो. स्वत:च्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावला. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली आणि नंतर मुख्यमंत्री बनणण्यासाठी विरोधी विचारधारा असलेल्यांचे तळवे चाटू लागले. आज त्यांनाच सत्य काय आहे ते कळलं आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. 

टोकाची चाटुगिरी महाराष्ट्रात चालू आहे -  संजय राऊत

यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र टीका करताना संजय राऊत यांची भाषा घसरली. मुंबईत पत्रकारांसोबत संवाद साधताना याबाबत भाष्य केले आहे. "सध्याचे मुख्यमंत्री आता काय *** चाटताय काय? ही चाटुगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. सध्याचा महाराष्ट्र चाटुगिरीचे टोक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही इतकी टोकाची चाटुगिरी महाराष्ट्रात चालू आहे. ज्यांची चाटली जातेय तेच आम्हाला ज्ञान देतायत," असे संजय राऊत म्हणाले.

Read More