Siddhant Shirsat relation with Woman : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज्य असताना अजून एका नेत्याच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट त्यांच्या मुलाच्या एक कारनाम्याने अडचणीत आले आहेत. एका विवाहित महिलेने सिद्धांत शिरसाट यांच्यावर लग्न, शारीरिक संबंध, गर्भपात अन् शारीरिक छश केल्याचा आरोप केला होता.
कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एका महिलेने शिरसाट यांच्या मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी आपल्याशी लग्न केलाचा दावा केला आहे. तसंच फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळाचा गंभीर आरोप या महिलेने केलाय. या महिलेचे जान्हवी सिद्धांत शिरसाट असून ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. सिद्धांत यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी तिने केली आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची ओळख सिद्धांत शिरसाट यांच्याशी 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटीली तेव्हा त्यांचे शारीरिक संबंध झाले. सिद्धांत यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत लग्नासाठी दबाव टाकला आणि सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून लग्न केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.
14 जानेवारी 2022 रोजी दोघांचे बौद्ध पद्धतीने लग्नही झालं असून त्याचे पुरावे संबंधित महिलेकडे असल्याचा दावा तिने केला आहे. एवढ्यावरच न थांबता, या संबंधातून महिलेचा गर्भधारणाही झाला होती, मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
महिलेचा आरोप आहे की, लग्नानंतर सिद्धांत यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. त्यांचे आधीचे विवाह संबंध, तसंच इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. 'जर तू पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करीन' अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्याचे आरोप आहेत.
20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. मात्र सिद्धांत यांचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही न करता प्रकरण दाबल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. महिलेच्या वकिलांनी सात दिवसांच्या आत सिद्धांत शिरसाट यांनी तिला नांदविण्यासाठी घरी घेऊन यावे आणि न्याय द्यावा, अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे..
सिध्दांत शिरसाटांसोबत ओळख मोबाईल, व्हॉटसअप, फेसबुक व इंस्टाग्रामद्वारे सन 2018 मध्ये झाली.
पुढे चेंबूरच्या फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली व त्यांनतर दोघांमध्ये वारंवार भेटी आणि शारिरिक संबंध प्रस्तापित झाले
लग्न करण्यासाठी सिध्दांत यांनी हातावर, शरीरावर ब्लेडने जखमा करुन लग्नासाठी इमोशनली ब्लॅकमेल केलं. तसेच स्वतःच्या डोक्याला पिस्तुल लावून मी गोळी मारुन घेईन व जीव देईन अशी धमकी दिली.
सततच्या लग्नाच्या मागणीमुळे सिद्धांत यांच्या आई, वडील, बहीण व इतर कुंटूंबा समवेत चेंबूर शिंधी कॅम्प येथील प्लॅटवर 14.01.2022 रोजी बौध्द रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले.
पुढे पीडित गर्भवती राहिले असता सिद्धांत यांनी सध्यातरी आपल्याला मुल नको म्हणून गर्भपात केला याबाबतचे कागदोपत्री वैद्यकीय पुरावे आहेत.
सिध्दांत यांनी यापूर्वी दोन लग्न केल्याची माहिती पीडित महिलाने केली आहे.
सिद्धांत यांनी पीडित मुलीची माफी मागून, पोलिसामध्ये तक्रार केली तर मी माझया डोक्यात गोळी घालून आत्महत्या करून घेईन अशी धमकी दिली. त्याचे फोटो उपलब्ध आहेत.
पीडित मुलगी राहत असलेला फ्लॅट सिध्दांत यांनी विकून टाकले आणि यापुढे मला कुठलाही फोन करू नकोस, नसता मी तुझे सर्व कुटूंब गुंडाकडून खत्म करेल अशी धमकी दिली.
माझे वडील मंत्री होणार आहेत व ते मुख्यमंत्री शिंदे याचे उजवे हात आहेत असेही सांगितले.
पीडित मुलीने 20.12.2024 रोजी शाहूनगर पोलीस स्टेशन रितसर तक्रार केली, मात्र संजय शिरसाट हे कॅबिनेट मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यामुळे त्यांनी पोलिसावर दबाव टाकल्यामुळे कार्यवाही होउ दिली नाही