Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

हॉटेल व्यवहारातून शिरसाट घेणार एक्झिट? पुराव्यांसह आरोपांचा बॉम्बगोळा डागणार? जाणून घ्या!

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांनी या हॉटेल खरेदी प्रक्रियेतून माघार घेण्याची घोषणा केली असली तरी अद्यापपर्यंत त्यांच्याकडून कुठलाही अर्ज प्रशासनाकडे करण्यात आलेला नाहीय. 

हॉटेल व्यवहारातून शिरसाट घेणार एक्झिट? पुराव्यांसह आरोपांचा बॉम्बगोळा डागणार? जाणून घ्या!

Sanjay Shirsat: विट्स हॉटेल खरेदी प्रकरणात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे वादात सापडलेत. या हॉटेल खरेदी प्रकरणात वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे मंत्री संजय शिरसाट यांनी खरेदी प्रकरणातून माघार घेण्याचे संकेत दिलेत. तर दुसरीकडे या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची एन्ट्री झालीय.

संभाजीनगरमधील विट्स हॉटेल खरेदी प्रकरणात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट वादात सापडलेत. 110 कोटींचं विट्स हॉटेल 67 कोटींना खरेदी केल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर विरोधकांनी केलाय. या आरोपांमुळे मंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेल खरेदी प्रक्रीयेतून माघार घेण्याची घोषणा केलीय. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची या वादात एन्ट्री झालीय. या हॉटेलच्या टेंडरिंगमध्ये 100 टक्के घोटाळा असल्याचं आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. तर या प्रकरणात बुधवारी सविस्तर बोलणार असल्याचं म्हणत दमानिया यांनी मोठा गोप्यस्फोट करण्याचे संकेत दिलेत. 

संजय शिरसाट यांनी या हॉटेल खरेदी प्रक्रियेतून माघार घेण्याची घोषणा केली असली तरी अद्यापपर्यंत त्यांच्याकडून कुठलाही अर्ज प्रशासनाकडे करण्यात आलेला नाहीय. लिलावाची पंचवीस टक्के रक्कम म्हणजे 19 कोटी रुपये भरण्यासाठी 20 जून पर्यंतची मुदत आहे. या मुदतीत 25 टक्के रक्कम न भरल्यास 20 लाखांची अनामत रक्कम जप्त होईल अशी माहिती उपविभागिय अधिकाऱ्यानी दिलीय.

हॉटेस विट्सच्या खरेदी प्रकरण अंगाशी येण्याची येतंय असं दिसताच आरोपांनतर मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणातून माघार घेण्याची घोषणा केली. मात्र दुसरीकडे या टेंडरमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता हे टेंडरच रद्द करण्याची मागणी केलीय..त्यात आता दमानिया उद्या या प्रकरणात कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

'आपलं घर जाळण्याच्या मनस्थितीत'

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट स्वतःचं घर जाळायला निघालेत. संजय शिरसाटांच्या मुलाच्या कंपनीनं संभाजीनगरचं विट्स हॉटेल खरेदी केलंय. या हॉटेलच्या खरेदीवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिरसाटांवर आरोप केलेत. 110 कोटींचं हॉटेल 65 कोटींना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या आरोपांमुळं व्यथित झालेल्या संजय शिरसाटांनी थेट आपलं घर जाळण्याच्या मनस्थिती आल्याचं म्हटलंय.संजय शिरसाटांच्या या आरोपांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सडेतोड उत्तर दिलंय. संजय शिरसाट फक्त घराला आग लावण्याच्या बाता मारत आहेत असा टोला दानवेंनी लगावलाय.संजय शिरसाटांनी हॉटेलच्या विक्रीवरुन अंबादास दानवे आणि संजय राऊतांना थेट आव्हान दिलंय. हॉटेलच्या व्यवहारातून सिद्धांत शिरसाटांना माघार घ्यायला लावतो हिंमत असेल तर दानवे किंवा राऊतांनी हॉटेल विकत घेऊन दाखवावं असं आव्हान शिरसाटांनी दिलंय.संजय शिरसाटांनी दिलेल्या आव्हानावर शिवसेनेनं पुन्हा पलटवार केलाय. आपला हॉटेलचा व्यवसाय नाही. त्यामुळं आपल्याला हॉटेल खरेदीत रस नसल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलंय.संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची खरेदी वादात सापडलीय. विरोधकांच्या आरोपांच्या बाणांमुळं संजय शिरसाट घायाळ झाल्याचं दिसतंय. हॉटेल नको पण आरोपांच्या फैरी आवरा या मानसिकतेपर्यंत ते आल्याचं दिसतंय.

Read More