Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांचे ज्या गाडीतून अपहरण झाले. त्या गाडीत 19 महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती आले. कारण आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल याच गाडीत आढळून आले. त्यामुळे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ यातील महत्त्वाचा पुरावा ठरली. 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे MH44 Z 9333 काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीत अपहरण करून हत्या झाली. या संपूर्ण प्रकरणात ही गाडी महत्त्वाची ठरली. कारण तपास यंत्रणेला तीन मोबाईल फोनसह एकूण 19 पुरावे याच गाडीत आढळून आले. त्यामुळे ही गाडी पुराव्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरली.
सरपंच संतोष देशमुख यांना लोखंडी पाईपला करदोडा बांधून मारहाण झाली. ते हत्यार देखील याच गाडीत आढळून आले. मांजरसुंबा - अंबाजोगाई महामार्गावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर ही गाडी चित्रीत झाली आहे. एवढेच नाही तर सहा आरसी बुक, सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड अशा बऱ्याच वस्तू यात आढळून आल्या आहे.ही गाडी आरोपी सुदर्शन घुलेच्या नावावर रजिस्टर आहे. देशमुख यांच्यासह असे कित्येक काळे कारणामे त्याने याच गाडीतून केले असतील असे अनेक प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात काळ्या चार चाकी गाडी मध्ये 19 महत्त्वाचे पुरावे सापडले. सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी महत्त्वाची ठरली. आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल त्यातील व्हिडिओ महत्वाचे ठरले. काळ्या काचाचे दोन गॉगल्स, सुदर्शन घुलेने मारहाण करताना काळ्या रंगाचे घातलेले जॅकेटही स्कार्पिओ गाडीत सापडले. सहा आरसी बुक सापडले. सुदर्शन घुलेचे, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 इंच लांबीचा पाईप सापडला. लोखंडी पाईप ज्याला क्लचर वायर बसवून तयार केलेले हत्यार आणि रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडा असे पुरावे सापडले.
संतोष देशमुख यांना आरोपींनी किती क्रूरपणे जीवे मारलं याची विदारक दृश्य दाखवणारे काही फोटो व्हायरल झाले आहेत. सीआयडीनं दाखल केलेल्या 1500 पानांच्या आरोपपत्रासोबत फोटो आणि व्हिडिओचे स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत. यातच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील अत्यंत भयानक पुरावा पुरावा समोर आला आहे. संतोष देशमुखांना मारहाण करून फुटलेल्या पाईपचे 15 तुकडे हस्तगत करण्यात आले आहेत. सीआयडीने जप्त केलेल्या पाईपचे 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत. देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा पुरावा पाहून अंगावर काटा येत आहे. देशमुख यांना इतकी बेदम मारहाण करण्यात आली की पाईपचे तुकडे झाले आहेत. 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे MH44 Z 9333 काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारमधून अपहरण करून हत्या झाली.
या संपूर्ण प्रकरणात ही कार महत्त्वाची ठरली. कारण तपास यंत्रणेला तीन मोबाईल फोनसह एकूण 19 पुरावे याच कारमध्ये सापडले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांना लोखंडी पाईपला करदोडा बांधून मारहाण झाली. ते हत्यार देखील याच कारमध्ये आढळून आले. देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर ही कार मांजरसुंबा - अंबाजोगाई महामार्गावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एवढेच नाही तर सहा आरसी बुक, सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड अशा बऱ्याच वस्तू यात आढळून आल्या आहेत. ही कार आरोपी सुदर्शन घुलेच्या नावावर रजिस्टर आहे.