Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वाल्मीकचा पाय आणखी खोलात गेला आहे. याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
तपासाबद्दल आम्ही समाधानी आहोत. कर्ता करविता, दुसऱ्या करवी मारुन घेणारा, खंडणी मागणारा, आडवा येतोय म्हणून संतोष देशमुखचा काटा काढा म्हणणारा हे सर्व वाल्मीक कराडच आहे. बाकीचे सांग कामे प्यादे आहेत. एसआयटीने बरोबर तपास केला आहे. दोन नंबरचा वजीर विष्णू चाटे असेल. आकाचा पाय आणखी खोलात गेलाय. इतक्या क्रूरपणे साडे तीन तास त्या लेकराला मारलं. पायचं नव्हे तर आता तो पूर्ण बुडेल, असे सुरेश धस म्हणाले. वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे आमच्याही कानावर आलंय. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना आग्रह केलाय. महाराष्ट्राची बिंदु नामावली नीटनेटकी करा. त्याचा पूर्ण फज्जा उडालाय, गुंड तयार होतायत. पोलीस काम सोडून अक्कासारख्यांची कामे करायला लागली आहेत. या पोलिसांची नावे तपासून पाहा. ठराविक आडनावे आहेत. दुसऱ्या जिल्ह्यात काही झालं असेल तर ते ठीक करा. वाल्मीक कराडवर कोणाचा वरदहस्त आहे, हे सर्वांना माहिती आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नेत आहोत. सर्व माहिती संकलित करुन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतोय. आमच्याकडे सभागृदेखील आहे. 80 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झालंय. तपासाचे काम चांगले झालंय, असे सुरेश धस म्हणाले.
खंडणी, अॅट्रोसिटी आणि खून हे वेगळं नव्हतं. हे धनंजय मुंडेंनी कराडला मारण्यासाठीचा गेम प्लान होता. पण आता हे सर्व एकत्रिक करण्यात आलंय. 7 तारखेला घुले कराडशी बोलतो की, आता कोणीही उठेल आणि आपल्याला उलट बोलेल. चाटे, घुले, कराड यांची मिटींग घेतात आणि खंडणीच्या मध्ये येणाऱ्यांना संपवावं असं ठरलं. व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलचा रेकॉर्डदेखील समोर आलाय. आरोपपत्र दाखल झालं तरी त्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळतंय. मित्रांशी बोलताय. गेली 10 वर्षे हे संघटीत गुन्हेगारी करतायत. येथे दुकानदार त्यांना हफ्ते देतायत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहीजे. कराडसारखी माणसं नाहीत हैवान आहेत. अशा माणसांना धनंजय मुंडे प्रोटेक्ट करतायत, असा आरोप अंजली दमानियांनी केलाय.