Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

देशमुखांच्या फोटोंनी खळबळ! रात्रीच्या 'त्या' बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? मस्साजोगमध्ये तणाव

Santosh Deshmukh Sarpanch Murder Case: सोमवारी सायंकाळी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

देशमुखांच्या फोटोंनी खळबळ! रात्रीच्या 'त्या' बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? मस्साजोगमध्ये तणाव

Santosh Deshmukh Sarpanch Murder Case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आज दिवसभर घडणाऱ्या घडामोडींकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अशातच सोमवारी रात्री उशीरा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'देवगिरी' बंगल्यावर पोहोचले. या ठिकाणी धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरेही उपस्थित होते. काल सायंकाळी धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबईपासून ते बीडपर्यंत घडामोडींना वेग आला आहे.

अजित पवारांच्या बंगल्यावर रात्री उशीरा बैठक

संतोष देशमुखांच्या हत्येला 84 दिवस उलटून गेल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांना दाखल केलेल्या आरोपपत्रामधील हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले. या फोटोंमध्ये कशाप्रकारे अमानुष पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली हे दिसून आलं. हे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोंडींना वेग आल्याचं चित्र सोमवारी रात्रीच पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'देवगिरी' बंगल्यावर सोमवारी रात्री महत्त्वाची महत्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस स्वतः अजित पवारांच्या बंगल्यावर हजर होते. या बैठकीत अजित पवार धनजंय मुंडे आणि सुनिल तटकरेही उपस्थित होते. 'देवगिरी'वर झालेल्या बैठकीत तब्बल दीड तास या चौघांमध्ये चर्चा झाली. धनंजय मुंडेंचा राजीनामा आज घेतला जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीड पोलिसांचं आवाहन

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. यादरम्यान तपासाचा भाग असलेले काही फोटो माध्यमांवर प्रसारित झाले. सदरील फोटो मनविच्छलित करणारे आहेत. त्यामुळे वायरल फोटो वरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रिया उमटत आहे. सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.

बीड बंदची हाक

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटोज माध्यमात वायरल झाल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यातील आरोपींना फाशी दिली जावी. अशी मागणी यादरम्यान करण्यात येते आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोप पत्रात सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचे फोटो समोर आले. त्यानंतर संतापाची लाट पसरली आहे.

जरांगेंच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडले धनंजय मुंडे

छत्रपती संभाजी नगरमधील रुग्णालायात दाखल असलेले मनोज जरांगे पाटील आज सकाळीच थेट मस्साजोगमध्ये पोहोचले. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबाला धीर देण्यासाठी जरांगे पोहोचले आहेत. जरांगेनी संतोष देशमुखांच्या भावाला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र संतोष देशमुखांचे बधून धनंजय देशमुख हे अगदी हुंदके देत रडले.

 

Read More