Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

यश बोरकर अपहरण आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी क्रुरकर्मा आरोपी संतोष कळवेला फाशीची शिक्षा

यश बोरकर अपहरण आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

नागपूर : नागपुरातील यश बोरकर या चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी क्रुरकर्मा आरोपी संतोष कळवेला जिल्हा सत्र न्यायलयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी यशचे अपहरण करून संतोषने हत्या केली होती. १० जून २०१३ ला यश खेळत असताना संतोष कळवेनं त्याचं अपहरण केलं. यशचे वडील नितीन हे सलूनचं दुकान चालवतात. त्यांना फोन करून त्याने यशच्या बदल्यात दोन लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिहान परिसरात यशचा मृतदेह सापडला. 

घटनेच्या दिवशी यशला संतोषच्या मोटरसायकलवर बसून जाताना काही जणांनी पाहिले होते. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी संतोषची कसून चौकशी केली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली केली. यशचे अपहरण केल्यानंतर त्याची हत्या केल्याचं संतोषने कबूल केले. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायलयाने आरोपी संतोष कळवेला अपहरण आणि खून या दोन्ही गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायलयाच्या निर्णयावर यशच्या आईवडिलांनी समाधान व्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडिओ

Read More