Ajit Pawar On Hinjewadi IT Park Problem : हिंजवडी पाहणी दौ-यात पालकमंत्री अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या आयटी पार्क बंगळुरु, हैदराबादला जात असल्याची कबुली दिली. कामाची पाहणी करत असताच अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलं. यावेळी अजित पवारांनी बांधकाम व्यावसायिकालाही सुनावल्याचं पाहायला मिळाले. सरपंच गणेश जांभुळकर यांनी अजित पवारांशी पंगा घेतला आहे. आयटी कंपन्यांचा उल्लेख करत सरपंच गणेश जांभुळकर यांनी अजित पवारां मोठा आरोप केला आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 दिवसांत दोन वेळा हिंजवडीचा दौरा केला. अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी सूचनांची अंमलबजावणी सुरुवात केली की नाही याची अजित पवारांनी प्रत्यक्षात पाहणी केली. हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्या बाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले पुण्यातल्या हिंजवडी पाहणी दौ-यात पालकमंत्री अजित पवार आक्रमक झाले होते. हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकरांना आणि बांधकाम व्यावसायिकालाही झापलं. त्यावेळी त्यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकरांना खडे बोल सुनावले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
यानंतर आता सरपंचांनी थेट अजित दादांशी पंगा घेतल्याचे दिसत आहे. हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकरांनी अजित पवार आमचं म्हणणं ऐकून घेत नाही, असा आरोप केलाय. आयटी कंपन्यांचं म्हणणं ते शांतपणे ऐकतात मात्र गावकऱ्यांची भावना मांडताना आम्हाला बोलू दिलं जात नाही, आम्हाला बैठकांनाही बोलावलं जात नाही, असं ते म्हणालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हिंजवडीच्या पाहणी दौ-यावर होते. दरम्यान, आयटीनगरी हिंजवडीच्या विकास कामांवरून हिंजवडी ग्रामस्थ आक्रमक झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मवाळकीची भूमिका घेऊन रस्त्यांविषयी योग्य मार्ग काढावा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावं लागेल, असा इशाराच हिंजवडी ग्रामस्थांनी दिला.