Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात भयानक अपघात, 3 ठार, 8 जखमी; उज्जैनला निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक

महाराष्ट्रात एक भीषण अपघात झाला आहे.  उज्जैनला देव दर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला आहे, सातारा येथे झालेल्या या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

महाराष्ट्रात भयानक अपघात, 3 ठार, 8 जखमी; उज्जैनला निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक

Satara Accident News : महाराष्ट्रात एक भीषण अपघात झाला आहे.  उज्जैनला देव दर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला आहे, सातारा येथे झालेल्या या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

सातारा जिल्ह्यात लोणंद-सातारा रस्त्यावर सालपे गावाजवळ रात्रीच्या सुमारास मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. इचलकरंजीहून उज्जैन देवदर्शनासाठी निघालेली मिनी ट्रॅव्हल्स आणि लोणंदहून साताऱ्याकडे येणारा ट्रक यांच्यात वळणावर समोरासमोर धडक झाली. अपघातात ट्रॅव्हल्स चालक सलमान सय्यद, एक महिला रजनी दुर्गुळे यांचा जाग्यावर मृत्यू झाला. तर एक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  

घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी मदतीस धाव घेतली. अपघातात मिनी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लोणंद पोलीस तपास करत आहेत. सांगलीच्या मिरज या ठिकाणी रेल्वेपुलावर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता,की दुचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला तर चार चाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. भराधाव दुचाकीस्वर आणि चार चाकी स्वारा वाहनाच्या मध्ये समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.अपघातामुळे काही वेळ- सांगली-मिरज मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

 

Read More