Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाबळेश्वरमधील विहिरीत सापडला 350 वर्षांपूर्वीचा शिवकालीन ठेवा; धोप तलवारीची मूठ अन्...

हा साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील कालखंड  असून त्यामुळं कुतूहलाचा विषय ठरणारा हा ऐतिहासिक ठेवा आता कोणती माहिती समोर आणणार... हे पाहणं महत्त्वाचं...   

महाबळेश्वरमधील विहिरीत सापडला 350 वर्षांपूर्वीचा शिवकालीन ठेवा; धोप तलवारीची मूठ अन्...

Satara News : सातारा जिल्ह्याचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो तेव्हातेव्हा हे नाव अतिशय आदबीनं घेतलं जातं. 'राजधानी सातारा' असं म्हणत इथल्या अनेक ऐतिहासिक संदर्भाचा दाखलाही दिला जातो. याच साताऱ्यातून आता इतिहासाची साक्ष असणाऱ्या अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळं इतिहास अभ्यासकही हैराण झाले आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार श्री क्षेत्र महाबळेश्वर इथं ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंचं निरीक्षण आणि अभ्यास करताना मुयुरेश मोरे या फलटणच्या अभ्यासकांना स्थानिक जाणकार राहुल कदम यांच्यासह एका निरीक्षणादरम्यान जुन्या विहिरीमध्ये मराठा धोप तलवारीची मूठ आणि सोबतच इतरही काही पुरातन वस्तू सापडल्या. मुळाच इंडियन आर्म्स अॅक्टनंतर ब्रिटीशांनी अनेक शस्त्र जप्त करत ती नष्टसुद्धा केली. त्यामुळं त्यांच्या हाती न लागेली ही शस्त्र सध्या कुतूहलाचा विषय ठरत आहेत.  शिवाय ऐतिहासिक ठेवा म्हणूनही त्यांना महत्त्वं प्राप्त आहे. 

काय आहे धोप तलवारीचं वैशिष्ट्य? 

ऐतिहासिकदृष्ट्या धोप तलवारीला अतिशय महत्त्वं प्राप्त असून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा आणि भवानी या त्याच प्रकारच्या तलवारी असल्याचं जाणकार म्हणतात. मराठा युद्धनीती आणि शस्त्रांस्त्रांचा पुरेसा अभ्यास करून धोप प्रकारातील या तलवारी बनवल्या जात. त्या काळात या तलवारी तयार करताना त्यासाठी फ्रेंच, पोर्तुगीज या देशातील बनावटीचं पातं वापरलं जात असल्यानं त्यांचा उल्लेख 'फिरंगी' म्हणूनही केला जात असे. या तलवारींमध्ये वापरण्यात आलेला धातू अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असून, या तलवारींचेही दोन प्रकार.  देखील म्हणत असत. हे पोलाद उत्कृष्ट दर्जाचे असत. या तलवारींचे दोन, उपप्रकार आहेत. पहिला प्रकार वक्र धोप याचे पाते टोकाचा पिपळा भाग थोडा वक्र असतो.

पहिला म्हणजे वक्र धोप आणि दुसरा म्हणजे सरळ धोप. वक्र धोपमध्ये तलवारीच्या पात्याचं टोक काहीसं वक्राकार असून सरळ धोपमध्ये हे पातं अगदी सरळ असतं असं इकिहासकार सांगतात. दरम्यान निरीक्षणातून समोर आलेल्या या वस्तूंचं महत्त्व लक्षात येताच कदम यांनी तातडीनं स्थानिक मुख्य व्यक्तींच्या कानावर ही बाब घालत पुढे उपविभागीय अधिकारी वाई यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली. 

महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीनं हा ठेवा विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून तो जबाबदार संस्थेकडे सोपवण्यात आला आहे. मुळात या तलवारींचा आणि त्यांच्या बनावटीचा कालखंड पाहता आता पुढील निरीक्षणातून नेमकी कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Read More