Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात बीड जिल्हा चर्चेत आला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे समोर आल्यानंतर आता बीडमधूनच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील खोक्या भाईचे अनेक कारनामे समोर येत आहेत. एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून खोक्या भाई उर्फ सतीश भोसलेचा शोध सुरू आहे. आता या खोक्या भाईचे अनेक कारनामे समोर येत आहेत.
बीडच्या शिरूर येथे वनविभागाकडून पाच ठिकाणी पंचनामा करण्यात आला. खोक्या भाई वर 200 काळविटांच्या शिकारीचा आरोप आहे. अशातच वनविभागाच्या अधिकाऱ्याने वन्यजीवांचे अवशेष जप्त केले असून हाडांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर खोक्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडले आहेत.
खोक्याच्या घरात धारदार शस्त्र जाळी, वाघुर आणि वन्यजीवांच्या प्राण्यांचे मांस ही आढळले आहेत. जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ याच्या मार्गदर्शनाने 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाड टाकली होती. तसंच खोक्याच्या घरी गांजाचे दोन पॅकेट सापडल्याचेही समोर आले आहे. त्यामुळं गांजा तस्करीचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
लक्झरी गाड्या, महागडे मोबाईल, अंगावर सोने असा थाट खोक्या भाईचा होता. याच सोबत खोक्याला वन्य जीवांची शिकार करून त्याचे मांस खाण्याची देखील आवड होती. वन्य जीवाला सापळ्यात अडकविण्यासाठी लावल्या गेलेल्या जाळ्याहून सतीश भोसले उर्फ खोक्याने दीपक ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दीपक ढाकणे यांचे आठ दात तुटले तर महेश ढाकणेला फ्रॅक्चर करण्यात आले. लॅवीष लाइफ जगण्यासोबत खाण्यापिण्याची आवड असलेला खोक्या भाई वन्यजीवांची शिकार करत होता. तो वास्तव्यास असलेल्या परिसरात हे अवशेष आढळून आल्याने वनविभाग पंचनामा करत असून हे अवशेष फॉरेनसिक लॅबला पाठवले आहेत.