Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरखाली चिरडला शाळकरी मुलगा, जागीच मृत्यू

School boy Died: उसाने भरलेल्या ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी रस्त्यावर असलेला शाळकरी मुलगा आनंद हा ट्रक्टरच्या मागील चाकात आला.

उसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरखाली चिरडला शाळकरी मुलगा, जागीच मृत्यू

वाल्मिकी जोशी, झी 24 तास, मुक्ताईनगर: यावल तालुक्यातील निमगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. उसाच्या ट्रॅक्टरखाली येऊन 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. आनंद रघुनाथ सोनवणे असे मयत मुलाचे नाव आहे.

उसाने भरलेल्या ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी रस्त्यावर असलेला शाळकरी मुलगा आनंद हा ट्रक्टरच्या मागील चाकात आला. यानंतर मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

सोनू पारधे असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. यावल पोलीस स्थानकात सोनू पारधे या ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read More