Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Viral Video: शाळेच्या गेटबाहेर चिमुरडीचा टाहो, घरी जाण्यासाठी नव्हे तर..., लोकं म्हणतात; 'आई-बाबांच्या भांडणाला...'

School Girl Viral Video:  रुवी कदम या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय. 

Viral Video: शाळेच्या गेटबाहेर चिमुरडीचा टाहो, घरी जाण्यासाठी नव्हे तर..., लोकं म्हणतात; 'आई-बाबांच्या भांडणाला...'

School Girl Viral Video: जुन महिन्यात शाळांना सुरुवात होते. बहुतांशजण त्याच शाळेत पुन्हा जात असतात. पण अनेकजणांसाठी शाळेचा पहिला दिवस असतो. काही विद्यार्थ्यांसाठी शाळा हा कंटाळवाणा विषय असतो. मग शाळेत जाण्यासाठी ते कंटाळा करतात. शाळेची वेळ झाली की काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागतं. शाळेच्या गेटच्या आतही अनेकांना जायचं नसतं. मुलांना शाळेत सोडताना पालकांची चांगलीच कसरत होते. तर याऊलट काहींना शाळा जीवापाड आवडते. शाळेत कधी जातोय, असे विद्यार्थ्यांना वाटते. तुम्ही पालक असाल तर तुमचं पाल्य यापैकी एकात फिट्ट बसत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. 

व्हिडीओ व्हायरल

शाळांना सुरुवात झाली असताना शाळेसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. रुवी कदम या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय. रुवीचे पालक तिच्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट चालवतात. ज्यात ते रुवीच्या जीवनातील अनेक आनंदी क्षण सोशल मीडियात अपलोड करत असतात. असाच एक क्षण त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 

नेमकं काय घडलंय?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शाळा सुटलेली दिसतेय. पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी शाळेच्या गेटवर उभे आहेत. शाळेची घंटा वाजली आणि एक एक मुलं बाहेर येऊन आपल्या पालकांना भेटतंय आणि घरचा रस्ता पकडतंय. पण रुवीच्या बाबतीत याऊलट घडतंय. घरी जाण्याऐवजी पुन्हा शाळेत जाण्यासाठी रुवी रडतेय. 'तिथे शाळेत जायचे नाही म्हणून बाकीची मुलं रडत होती आणि माझी मुलगी स्कूल सुटले तरी तिला स्कूल ला जायचे होते', अशी कॅप्शन रुवीच्या पालकांनी व्हिडीओवर लिहिलीय. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. 

मजेशीर प्रतिक्रिया 

मॅडम आईपेक्षा जास्त लाड करणारी भेटली असे वाटायला लागले आहे, अशी मिश्किल कमेंट एकाने केलीय. नव्वदीच्या मुलांना अर्धी शाळा घरी घ्यायला यायची आणि उचलून घेऊन जायची, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने दिलीय.वाह! पुढे जाऊन ही मुलगी आयएएस, आयपीएस होणारं, अशी प्रतिक्रियादेखील देण्यात आलीय.काही दिवसांनी हीच शिक्षकांचा क्लास घेईल असे वाटते. शिस्त म्हणजे शिस्त. अशी प्रतिक्रिया एकाने लिहिलीय. घरी एवढा त्रास का देता तुम्ही? आई वडिलांच्या वादाला कंटाळलं असेल बाळ, अशी मिश्किल प्रतिक्रिया एकाने दिलीय. मागच्या आठवडाभरात या व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आलेल्या पाहायला मिळतायत.  

Read More