Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑक्‍टोबर महिन्‍यात 'इतके' दिवस शाळा बंद

Holidays in October 2023: गांधी जयंतीव्यतिरिक्त नवरात्र ते दसरा या महिन्यात असल्याने अनेक दिवस शाळा बंद राहणार आहेत. यासोबतच ऑक्टोबर महिन्यात पाच रविवार येणार आहेत. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑक्‍टोबर महिन्‍यात  'इतके' दिवस शाळा बंद

Holidays in October 2023: प्रत्येक महिना सुरु होण्याआधी शालेय विद्यार्थी आपल्या स्कूल डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत, हे आवर्जुन पाहतात. सलग सुट्ट्या असतील तर पालकदेखील त्यानुसार फिरण्याचे प्लानिंग करतात. शालेय विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थी अशा अनेक सुट्ट्या घेता आल्या. आता ऑक्टोबर महिनादेखील विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्या घेऊन आला आहे. कोणत्या दिवशी आहेत या सुट्ट्या? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

ऑक्टोबर हा महिना शाळांच्या सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात गांधी जयंतीसह अनेक सण येतात. दसरा आणि नवरात्रीही ऑक्टोबरमध्ये आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये अनेक दिवस शाळा बंद राहणार आहेत. शाळेतील मुलांना या सुट्ट्यांबद्दल अगोदर माहिती असेल तर त्याप्रमाणे ते सुट्टीचे नियोजन करू शकतात.

ऑक्टोबरमध्ये किती दिवस शाळा बंद राहणार?

गांधी जयंतीव्यतिरिक्त नवरात्र ते दसरा या महिन्यात असल्याने अनेक दिवस शाळा बंद राहणार आहेत. यासोबतच ऑक्टोबर महिन्यात पाच रविवार येणार आहेत. महिनाच (१ ऑक्टोबर) रविवारपासून सुरू झालाय. यानंतर 8 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर रोजी रविवार आहेत. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये पाच रविवार असतील.

ऑक्टोबर 2023 मधील सुट्ट्यांची यादी

1 ऑक्टोबर रोजी रविवारची सुट्टी
2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीची सुट्टी
8 ऑक्टोबर रोजी दुसरा रविवार
14 ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार (या दिवशी काही शाळांना सुट्टी असेल)
15 ऑक्टोबर रोजी तिसरा रविवार
22 ऑक्टोबर रोजी चौथा रविवार
24 ऑक्टोबर रोजी दसरा, दुर्गा विसर्जन
28 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा, चौथा शनिवार
29 ऑक्टोबर रोजी पाचवा रविवार

काही शाळांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मुलांना सुट्टी दिली जाते. असे असताना 14 ऑक्टोबरला दुसरा शनिवार, 15 ऑक्टोबरला तिसरा रविवार, 28 ऑक्टोबरला चौथा शनिवार आणि 29 ऑक्टोबरला पाचवा रविवार अशी सलग सुट्टी असेल. प्रत्येक राज्याच्या महत्वाच्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांप्रमाणे तेथील विद्यार्थ्यांना सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे या सुट्ट्या राज्यांप्रमाणे बदलतात, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.

Read More