Secret meeting Between Devendra Fadnavis and Aditya Thackeray : विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीचा तपशील समोर आलेला नाही. फक्त भेटच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात बैठक झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी मुंबईच्या बीकेसीमधील सोफिटेल हॉटेलमध्ये आले होते. यावेळी फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. यावरूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची देखील माहिती आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी चर्चेचा विषय झालाय. 16 जुलै रोजी उद्धव ठाकरे पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले. कामकाजाच्याआधी लॉबीत फडणवीस आणि ठाकरेंमध्ये हास्यविनोदात नमस्कार झाला. लॉबीतल्या या भेटीत औपचारिकता नव्हती. जेव्हा परिषदेत दानवेच्या समारोपाची भाषणं झाली त्यावेळीही फडणवीसांनी 2029 आधी ठाकरेंना सत्ताधारी बाकांकडं येण्याचा स्कोप असल्याची जाहीर ऑफर दिली.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट कमी की काय त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे फडणवीसांची भेट झाली. आदित्य़ कार्यक्रमातून निघत असताना देवेंद्र फडणवीसांसाठी थांबले. एवढंच नाही तर तुम्ही ऑफर दिली म्हणून मी स्वागताला थांबलो असंही त्यांनी चेष्टेनं म्हटलं. ठाकरे-फडणवीसांच्या नात्यात सहजपणा आलेला असतानाच उद्धव ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांची भेट घेतली होती. एवढंच नव्हे तर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाली. चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी या दोघांच्या भेटीत राजकीय वातावरण मात्र भलतचं तापलेलं पाहायला मिळालं.
राजकारणात जे दिसतं तसं काहीच नसतं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी औपचारिक असल्याचं सांगण्यात आलं तरी आतमध्ये काहीतरी वेगळंच शिजल्याचा वास येतोय. आता दोघांच्या चर्चेत काय खिचडी शिजलीये हे पुढच्या काळात कधीतरी नक्कीच स्पष्ट होणार. फडणवीस-ठाकरेंच्या भेटीगाठींमुळं शिवसेना नेत्यांच्या पोटात मात्र गोळा आलाय हे मात्र तेवढंच खरं.