Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मोबाईलचे रिकामे बॉक्स पाठवून मोबाईल विक्रेत्याला ५ लाखांचा चुना

ऑर्डरच्या बदल्यात मोबाईलचे रिकामे बॉक्स

मोबाईलचे रिकामे बॉक्स पाठवून मोबाईल विक्रेत्याला ५ लाखांचा चुना

उल्हानगर : दिल्लीच्या तीन भामट्यांनी उल्हासनगरच्या मोबाईल विक्रेत्याला ५ लाखांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. ऑर्डरच्या बदल्यात मोबाईलचे रिकामे बॉक्स आणि केवळ चार्जर पाठवून व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. विकास सावंत या तरूणाचा उल्हासनगर कॅम्प ३ येथे मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. 

विकासने याआधी तीन वेळा आरोपींकडून मोबाईल फोन खरेदी केले होते. यामुळेच विकासने आरोपींवर विश्वास ठेवून डिसेंबर महिन्यात २१३ मोबाईल फोनसाठी ४ लाख ९० हजार रूपये ऑनलाईनने पाठविले. त्यांनतर विकासला २१३ मोबाइल फोनचे कुरिअर मिळालं. हे पार्सल त्याने उघडून बघताच त्याला धक्का बसला. त्या पार्सलमध्ये चक्क मोबाईलचे रिकामे बॉक्स आणि कागदाची रद्दी भरलेली होती. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Read More