Dhananjay Munde Resignation: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष केलं जात होतं. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. भाजपा आमदार सुरेस धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर यावरुन रान पेटवलं होतं. यानंतर आझ अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. राज्यपालांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारला आहे. दरम्यान या राजीनाम्याचा घटनाक्रम कसा होता हे समजून घ्या.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. त्यांनी यासंदर्भात अजित पवारांशी चर्चाही केली होती. पण धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. अखेरीस देवेंद्र फडणवीस यांनी जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल अशी भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या या इशार्यानंतर वातावरण बदललं.
दरम्यान रविवारी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. प्रारंभीपासूनच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती, अशी सूत्रांची माहिती आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही होते.
- यापूर्वी 3 ते 4 वेळा अजितदादांशी त्यांनी चर्चा केली होती.
- स्वत: धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितले होते. पण, धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते.
- शेवटी एका क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका घेतली की, जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल. या इशार्यानंतर वातावरण बदलले.
- काल पुन्हा धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. प्रारंभीपासूनच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती, अशी सूत्रांची माहिती आहे.
- म्हणूनच एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.