Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

येरवड्यात 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश, मानव तस्करी उघडकीस

पुण्यातील येरवडा परिसरातील 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी दोन मुलींची सुटका केलीय. 

येरवड्यात 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश, मानव तस्करी उघडकीस

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातील 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी दोन मुलींची सुटका केलीय. 

धक्कादायक म्हणजे, या दोन्हीही मुली उझबेकीस्तानातून इथे आणण्यात आल्या होत्या. त्या इथंपर्यंत कशा पोहचल्या याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.

१४ मार्च रोजी रात्री ८.३० वाजल्याच्या सुमारास दोन परदेशी मुलींचा वापर करून अवैध धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर कारवाई करत पोलिसांनी  हॉटेल रॉयल ऑर्चिड गोल्डन सूटवर धाड टाकली. 

या प्रकरणात येरवडा पोलिसांनी दोन परदेशी मुलींची सुटका केली... तर एकाला अटक करण्यात आलीय. विकास ऊर्फ डंबर दलू गिरी असं या २६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. 

विकासला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. हा प्रकार मानवी तस्करी संबंधात असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक रोहिणी तुकाराम शेवाळे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने विकासला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावलीय. 
 

Read More