Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नोकरीचे आमिष दाखवत ३० वर्षीय युवतीवर चौघांचा अत्याचार; तिघांना अटक

 दिवसा ढवळ्या महिलेवर अत्याचाराची घटना

नोकरीचे आमिष दाखवत ३० वर्षीय युवतीवर चौघांचा अत्याचार; तिघांना अटक

अमरावती : एका ३० वर्षीय ओळखीच्या युवतीला रोजगाराचे आमिष दाखवून युवतीला भेटायला बोलावून चौघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरा लगत एका गावातील शेतशीवारात घडली. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी चार नराधमांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक केली आहे तर एक आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सूरु आहे.

सुनील विष्णु राठोड वय २७, दिनेश पानसिंग जाधव वय ३०, रतन अवधूत पाटील वय २५  आणि समिर असे गुन्हे दाखल करन्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांतील समीर नावाचा आरोपी हा फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पीडित तरुणी ही अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका खेड्या गावात राहणारी आहे.

मागील काही महिन्यांपासून रोजगारासाठी ती अमरावती शहरात भाड्याने राहते. दरम्यान मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी एका कापड दुकानात ती कामाला होती. दरम्यान याच दुकानात काम करणाऱ्या समीर या तरुणाशी पीडित तरुणीची ओळख झाली. मात्र काही कारणामुळे या तरुणीने या दुकानात काम करणे बंद केले.

दरम्यान या समीर नावाच्या युवकाने त्या पीडितेला फोन करून तुला एका दुकानात काम देतो असे सांगून तिला अमरावती मधील एका मुख्य चौकात बोलाऊन घेतले. त्यावेळी समीरने त्या युवतीला सांगितले ज्या दुकानदाराला आपल्याला भेटायचे आहे त्याला यायला वेळ आहे. तो पर्यंत आपण माझ्या भानखेड मधील शेतातून परत येऊ त्यानंतर पीडित युवती ही समीर सोबत शेतात गेली दरम्यान समीर व्यतिरिक्त तीन आरोपी हे आधीच शेतात पोहचले होते.

शेतात पोहचताच या चौघांनी या तरुणीवर रात्री आठ वाजेपर्यंत सामूहिक अत्याचार केला. दरम्यान रात्री या युवतीने कशीबशी आपली सुटका केली. मात्र दिवसा ढवळ्या घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More