Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शरद पवार यांचा हल्लाबोल; भाजपसोबत जाणारे सत्तेततून बाहेर जातात, मित्र पक्षांना संपवणं हेच 'त्यांचं' ध्येय!

  जे लोक भाजपसोबत जातात ते सत्तेततूनही बाहेर जातात असं म्हणत शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मित्र पक्षांना संपवणे हेच भाजपचं ध्येय असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.  शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरवरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे.  

शरद पवार यांचा हल्लाबोल; भाजपसोबत जाणारे सत्तेततून बाहेर जातात, मित्र पक्षांना संपवणं हेच 'त्यांचं' ध्येय!

Maharashtra NCP Crisis :  जे लोक भाजपसोबत जातात ते सत्तेततूनही बाहेर जातात असं म्हणत शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मित्र पक्षांना संपवणे हेच भाजपचं ध्येय असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.  शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरवरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे.  

शिवसेनेसोबत जाणे आणि भाजपसोबत जाणे यात फरक आहे

यावेळी शरद पवार यांनी हुंदूत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर जोरदार हल्लाबोल.  शिवसेनेचे हिंदूत्व 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाणार आहे. भाजपचं  हिंदूत्व हे जाती जातींमध्ये विभाजन करणारे आहे.  कोल्हापूर, अमरावतीवती दंगली झाल्या.  महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली झाल्या यामागे कुणाचा हात आहे ते सगळ्या जगाला माहित आहे असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.  

चीन्ह जाणार नाही, मी जाऊ देणार नाही

'हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात', 'राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घाम गाळून निवडून दिलं' ,'हे योग्य नाही', 'घड्याळ्याची खूण निवडणूक आयोगानं आम्हाला दिलीय','चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही', 'राष्ट्रवादी पक्ष, ऑफिसवर ताबा घेण्याचा प्रयत्न', चिन्हावर दावा सांगणाऱ्या बंडखोरांना शरद पवारांना इशारा. 'राजकीय जीवनात विविध चिन्हांवर निवडणूक लढलो', 'तुम्ही देशाचे नेते, पक्षाचे नाही', 'त्यांचं नाणं खणकन वाजत नाही', 'पोस्टरवर माझे फोटो लावतात', 'जनतेचा पाठिंबा आहे तोवर चिन्हाची काळजी नाही', शरद पवार यांचा अजित पवार गटाला टोला.  चीन्ह जाणार नाही, मी जाऊ देणार नाही असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला. 

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

भाजपसोबत जो गेला, तो संपला, असं म्हणत शरद पवारांनी इशारा दिलाय. चिन्ह जाऊ देणार नाही, असं आश्वासन पवारांनी दिलंय. तर त्यांचं नाणं चालणार नाही हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला, असा टोलाही शरद पवारांनी अजित पवार गटाला लगावलाय. गेले त्यांची चिंता नको म्हणत पवारांनी अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..... हा नवा नारा पवारांनी दिला आहे. 

 

Read More