Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शरद पवारांकडून गडकरींची स्तुती तर फडणवीसांवर टीकास्त्र

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

शरद पवारांकडून गडकरींची स्तुती तर फडणवीसांवर टीकास्त्र

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत परंतु येथील रस्ते खड्डेयुक्त आहेत, गडकरींनी केंद्रातील निधीतून उड्डाणपुलाची चांगली कामं केली मात्र विदर्भासह राज्यात रस्त्यांच्या दयनीय अवस्थेस मुख्यमंत्र्यांची निष्क्रियता जबाबदार असल्याचं वक्तव्य यवतमाळमध्ये शरद पवारांनी केलं आगे.

गुजरातकडून येणार्‍या सूचनांचंच पालन मुख्यमंत्री करीत असून देश आणि राज्याचं त्यामुळे नुकसान होत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. समोर कोणताच पहेलवान नाही असे बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांच्या काळात किती कारखाने बंद झाले, किती रोजगार गेले, शेतकरी आत्महत्येची आकडेवारी जरी दिली तरी त्यांचे कतृत्व दिसेल अशी बोचरी टीका पवारांनी केली.

Read More