Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शरद पवार 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार ?

 2014 च्या निवडणुकीआधी यापुढे निवडणूक न लढवण्याचा शरद पवार यांनी घेतला होता.

शरद पवार 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार ?

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा निवडणूक रिंगणात दिसणार का ? ही चर्चा आता राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय. शरद पवार 2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविण्यात येतेयं. लोकसभेच्या पुणे मतदारसंघातून पवार निवडणूक लढवू शकतात अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.  लोकसभेचा पुणे मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेसकडे असला तरी पवारांसाठी राष्ट्रवादी हा मतदारसंघ मागून घेणार असल्याचेही सांगण्यात येतयं.

पवार किंगमेकर ?

देशातील वातावरण पाहता भाजपाच्या अंदाजे 100 जागा कमी होतील असा विरोधकांना विश्वास आहे. तर काँग्रेसला 140 ते 150 च्या वर जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात येतोय.  राष्ट्रवादीच्या सध्या राज्यात 5 जागा असून 2019 च्या निवडणुकीत हा आकडा 10 ते 12 पर्यंत जाईल असा विश्वास राष्ट्रवादीला आहे.

2019 च्या लोकसभा त्रिशंकू असण्याची शक्यता लक्षात घेऊन पवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. 

बारामतीनंतर पुणे हा शरद पवार यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. त्रिशंकू अवस्थेत सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

अशा स्थितीत पवार लोकसभेत असणे गरजेचे असल्याचं राष्ट्रवादीची भूमिका आहे.

पुन्हा रिंगणात ?

2014 च्या निवडणुकीआधी यापुढे निवडणूक न लढवण्याचा शरद पवार यांनी घेतला होता. त्यानुसार पवारांनी 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. यावेळी मात्र पवार निवडणूक रिंगणात पुन्हा उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Read More