Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शरद पवारांची माघार म्हणजे युतीचा विजय- मुख्यमंत्री

पवारांच्या या निर्णयावर भाजपाने हात धूवुन घेतला आहे. 

शरद पवारांची माघार म्हणजे युतीचा विजय- मुख्यमंत्री

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंतर शरद पवार या मतदार संघासाठी इच्छुक होते. पण कौटुंबिक कलहामुळे त्यांना ही माघार घ्यावी लागत असल्याची चर्चा आहे. कारण काहीही असले तरी पवारांच्या विरोधकांनी याचा राजकीय फायदा घेण्याची संधी सोडली नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

fallbacks

शरद पवारांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणे हा युतीचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर पवारांनी पराभवाच्या भीतीने माघार घेतल्याचा टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लगावला आहे. 

fallbacks

पवारांच्या या निर्णयावर भाजपाने हात धूवुन घेतला आहे. महिनाभर बैठका घेतल्यानंतर,  दौरे केल्यानंतर माढा इथे पराभवाच्या भीतीने पवारांनी माघार घेतल्याचे सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच पवारांची माघार म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पहिला विजय हा माढामधून मिळाला असल्याचं देशमुखांनी जाहीर केले. तर  मुख्यमंत्र्यानी युतीचा हा मोठा विजय असल्याचे मत व्यक्त केले. देशांत मोदींना पाठींबा देणारे वातावरण आहे. एकदा सभेत मोदी म्हणाले होते की शरद पवार हवा का रुख भाप लेते है, यावेळी त्यांना हे समजले असणार असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  

Read More