Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिर्डी, नाशिक एअरपोर्टवर सोमवारपासून विमानसेवा सुरु

 शिर्डी आणि नाशिक एअरपोर्ट वर २५ मेपासून विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ 

शिर्डी, नाशिक एअरपोर्टवर सोमवारपासून विमानसेवा सुरु

नाशिक : देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. असे असले तरी सर्व बाबींचा विचार करता केंद्र सरकारतर्फे काही सवलती देण्यात आल्या आहेत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. दरम्यान गेल्या २३ मार्चपासून बंद असलेल्या शिर्डी आणि नाशिक एअरपोर्ट वर २५ मेपासून विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हे वाचा : लॉकडाऊन काळात शिर्डीत साईंचरणी इतक्या कोटींचं दान

पहिल्या टप्प्यात शिर्डी-हैदराबाद आणि नाशिक-अहमदाबाद अशी विमानसेवा सोमवारपासून सुरू होतेय. 

सध्या सिव्हिल एव्हिएशन आणि इंडिगो यांना दोन फ्लाईट्सना परवानगी देण्यात आली आहे. 

हे वाचा : साईंचरणी सेवेत असणाऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाने उचललं 'हे' पाऊल

सध्या या कंपन्यांनी आठवडाभराचाचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. 

यात प्रवास करताना घेण्याची खबरदारी तसेच जिल्हा प्रशासनालाही प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read More