Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरुन कुणाल कामराचा क्लब फोडला! राऊतांचा CM वर निशाणा; म्हणाले, 'देवेंद्रजी, तुम्ही...'

Kunal Kamra Comment On Shinde Raut Reacts: संजय राऊतांबरोबरच आदित्य ठाकरेंनीही या प्रकरणावर भाष्य करताना निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरुन कुणाल कामराचा क्लब फोडला! राऊतांचा CM वर निशाणा; म्हणाले, 'देवेंद्रजी, तुम्ही...'

Kunal Kamra Comment On Shinde Raut Reacts: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं तयार करणारा कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. कुणाल कामराने ज्या क्लबमध्ये शो केला त्या शोमध्ये शिंदेंवर टीका केल्याने खारमधील हा क्लब रात्री शिवसैनिकांनी फोडला आहे.  या प्रकरणावरुन एकनाथ शिंदेंचे समर्थक आक्रमक झालेले असतानाच या प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचे पुत्र तसेच वांद्र्याचे आमदार आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे समर्थकांवर निशाणा साधला आहे. तसेच ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरेंनी साधला निशाणा

आदित्य ठाकरेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करताना कुणाल कामराने केलेलं गाणं 100 टक्के खरं असल्याचं म्हटलं आहे. "एकनाथ मिधेंबद्दल कुणाल कामराने केलेले गाणं 100 टक्के खरं आहे. मिंधेंच्या भित्र्या टोळीने कॉमेडियन कुणाल कामराने ज्या शोच्या स्टेजवर कार्यक्रम सादर केला. एका गाण्यावर केवळ सुरक्षित वाटणारे भित्रे लोक अशाप्रकारे व्यक्त होऊ शकतात," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

"बरं राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही?" असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. "एकनाथ मिंधेंकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमी लेखण्याचा हा प्रयत्न झाला," असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं! मुंबईत तुफान राडा; क्लबची तोडफोड, नेमकं घडलं काय?

fallbacks

राऊतांनाही लगावला टोला

'कुणाल कामरा एक प्रख्यात लेखक आणि स्टँडअप कॉमेडियन असून, महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याने एक व्यंगात्मक गीत लिहिलं तर शिंदे गटाला मिरच्या झोंबल्या. त्यांनी कुणाल कामराचा स्टुडिओ तोडला. देवेंद्रजी, तुम्ही एक कमकुवत गृहमंत्री आहात.' अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी केली. 

fallbacks

राऊतांना टॅग करत शिंदेंच्या महिला नेत्याची टीका

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना टॅग करुन निशाणा साधला आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा हा तोच भामटा कुणाल कामरा. बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामराने एकनाथ शिंदे साहेबांची माफी मागावी नाहीतर हा असंगाशी संग करणाऱ्या कामराला आणि त्याच्या 'आका'ला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागणार हे नक्की," असं शितल म्हात्रे म्हणाल्या आहेत. 

राड्यानंतर कुणालची पहिली प्रतिक्रिया

कुणाल कामराने शिंदेंवर टीका केल्यानंतर वाद सुरु झाल्याने त्याने हातात संविधानाची प्रत पकडलेला स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. 'पुढे जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे,' असं कुणालने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

About the Author

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बात... Read more

Read More