Sanjay Shirsat On ED Notice: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वर गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाचाराबाबत अनेक आरोप झाले आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी फक्त शांत राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र संभाजीनगरमधील एका कार्यक्रमातील संजय शिरसाट यांचे एक वक्तव्य मात्र चांगलेच चर्चेत आले आहे.
आता यापुढं ब्लॅकचे पैसे चालणार नाही असे विधान त्यांनी केलं आहे. पुढं जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर त्या ठिकाणी हशा पिकला. सोबतच मला आयकर विभागाकडून नोटीस आल्याची त्यांनी भर कार्यक्रमात जाहीर कबुली दिली.
2019 मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती आणि 2024 मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली असे विचरल्याचे संजय शिरसाट यांनी कार्यक्रमात सांगितले. याबाबत मला 9 तारखेला खुलासा करण्याचे सांगितले आहे असं ते म्हणाले.
आयकर विभागाच्या नोटीसला उत्तर देणार-शिरसाट
आयकर विभाग असेल किंवा इतर कोणतेही विभाग असतील ते त्यांचं काम करत आहेत. त्यामध्ये चुकीचं काही नाही. 2019 आणि 2024 मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ याबद्दलचे त्यांनी स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यामुळे त्यांचं काम ते करत आहेत. जर इतर लोकांना वाटतं की राजकीय लोकांवर आणि पुढाऱ्यावर कारवाई का होत नाही असं नाहीये. त्यांनी पाठवलेल्या नोटीसला मी उत्तर देणार आहे.
काही लोकांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली. त्यानंतर त्यांनी मला नोटीस पाठवली. त्यांनी 9 तारीख दिली आहे. पण आम्ही त्यांना वेळ मागितला आहे. त्यांना आम्ही उत्तर देणार आहे. यामध्ये गैर असं काही नाही. काही लोकांची पोटदुखी आहे. त्याला आम्ही समर्थपणे उत्तर देऊ. सरकारकडून माझ्यावर कोणताही दबाव नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
संजय शिरसाट यांच्यावर झालेल्या विट्स हॉटेल आरोप प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र कुठलीही शंका मनात नको, स्वतः संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे. टेंडरमध्ये चुकीचं असेल तर ते तपासू असे मुख्यमंत्री म्हणाले. तर आमच्या मंत्र्यांची जाणूनबुजून चौकशी लावलेली नाही असं दावा उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उदय सामंत यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री मोठे आहेत की उदय सामंत मोठे आहेत असा सवाल उपस्थित केला आहे.