हिंदी भाषेच्या मुद्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे आक्रमक झाली असतानाच, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली. दोन्ही शासन निर्णय रद्द करतो असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं. त्रिभाषा धोरणाचा GR रद्द करत असल्याचं ते म्हणाले. तसंच निवृत्त IAS अधिकारी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून, त्या समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईलं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावर मराठी माणसांनी एकत्र येऊ नये यासाठी सरकारकडून GR रद्द करण्यात आल्याची टीका, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली. तसंच मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय असल्याचंही उद्धव म्हणाले.