ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई : विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्यानं नाराज असलेले भास्कर जाधवांच्या जखमेवर सत्ताधा-यांनी मीठ चोळलं आहे. विरोधकांनी सरकारला लिहलेल्या पत्राचा हवाला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना चिमटे काढले. विरोधकांच्या पत्रावर भास्कर जाधवांची सही नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं. विरोधकांमधील नाराजीवर फडणवीसांनी नेमकं बोट ठेवलं
मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांचा उल्लेख केल्यानंतर भास्कर जाधवांची चांगलीच अडचण झाली होती. भास्कर जाधवांच्या चेह-यावरुन तरी ते स्पष्टपणे दिसत होतं. भास्कर जाधव जेव्हा विधिमंडळात आले तेव्हा ते मी पोडियमवर बोलतो असं सांगत वेळ मारुन नेली. पत्रकार प्रश्न विचारत होते, तरीही भास्कर जाधव पोडियम. पोडियम असे ओरडत होते. भास्कर जाधवांनी ती वेळ मारुन नेली. पुन्हा भास्कर जाधव कामकाजावेळी विधिमंडळात जाणार तेव्हाही झी 24 तासच्या प्रतिनिधीनं त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही राष्ट्रगीत महत्वाचं असं म्हणत भास्कर जाधवांनी काढता पाय घेतला. भास्कर जाधव विधिमंडळात पूर्ण दिवस पत्रकारांना चुकवत होते. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी याबाबत विचारलं तेव्हा त्यांनी पुन्हा चिमटा घेण्याची संधी सोडली नाही.
विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा कार्यक्रमच विधिमंडळ अधिवेशनात नाही आहे. विरोधी पक्षनेते निवडीबाबत विधानसभा अध्यक्षही एकदम निवांत दिसत आहेत. महाविकास आघाडीचे कोणतेही नेते भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी पाठपुरावा करत नाही येत आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळत नाही म्हणून नाराज आहे हे सांगून भास्कर जाधवांची आणखी अडचण झाली आहे.