Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मतदारांना शिवीगाळ ते छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान; संजय गायकवाडांचे 8 वाद!

MLA Sanjay Gaikwad Controversy:  वादात येण्याची गायकवाड यांची ही पहिली वेळ अजिबात नाही. यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये आणि कृतीमुळे ते चर्चेत राहिले आहेत.

मतदारांना शिवीगाळ ते छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान; संजय गायकवाडांचे 8 वाद!

Shivsena  MLA Sanjay Gaikwad Controversy: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमीच आपल्या वादग्रस्त विधान किंवा कृतीमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांचा आमदार निवासातील एक व्हिडीओ समोरआलाय.  त्यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून मारहाण केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शिळा भात आणि खराब डाळ दिल्याने संतापलेल्या गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चोपलं. 'निकृष्ट जेवण सहन करणार नाही', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, काँग्रेसने गायकवाडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. वादात येण्याची गायकवाड यांची ही पहिली वेळ अजिबात नाही. यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये आणि कृतीमुळे ते चर्चेत राहिले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य:

छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते का? अशा आशयाचे वक्तव्य संजय गायकवाडांनी केले होते. यामुळे महापुरुषांचा अपमान झाल्याचा आरोप होऊन मोठा वाद निर्माण झाला.

राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान:

राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख बक्षीस देण्याची घोषणा केली. यामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली.  

मतदारांना जाहीर शिवीगाळ:

फक्त दारू-मटण अन् दोन हजारात विकले भाडXX साले, यांच्यापेक्षा रांX बऱ्या" असे मतदारांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होऊन त्यांच्यावर जोरदार टीका झाली.   

पोलिसांबद्दल अपमानास्पद वक्तव्य:

महाराष्ट्र पोलिसांना "अकार्यक्षम खातं" म्हटले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत ताकीद दिली. 

पोलीसाला गाडी धुवायला लावली   

एका पोलीस कर्मचाऱ्याला आपली गाडी धुवायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे पोलिसांच्या गैरवापराचा आरोप झाला.

शेतकऱ्यांना वादग्रस्त सल्ला:

"सरकारने कर्जमाफी दिली नाही, तर शेतकऱ्यांनी बँकांच्या दारात जाऊन मारामारी केली तरी चालेल" असे वक्तव्य केले. यामुळे शेतकऱ्यांना हिंसक मार्गासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप झाला.

महायुतीतील बंडखोरीवर टीका

भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या बंडखोरीवर "विजयराज शिंदे ही चिल्लर केस, त्याच्या बापात दम असेल तर..." असे आक्षेपार्ह विधान केले.

कॅन्टीन चालकाला मारहाण 

संजय गायकावाडांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. जेवणातील डाळ खराब झाल्याचं लक्षात आलं ज्यामुळं त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. त्याच्याकडून व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याचं पाहून गायकवाडांनी त्याच्यावर हात उगारला. आमदार किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा इतका निकृष्ट असल्याची शहानिशा झाल्यानंतर गायकवाड यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आणि त्यासंर्भात अन्न व प्रशासन विभागाकडेही यासंदर्भातील, कॅन्टीन चालकाची तक्रार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. 

सतत चर्चेत राहण्याची वृत्ती

 आक्रमक आणि बेधडक शैलीमुळे आमदार संजय गायकवाड सतत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहतात.अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे पक्ष आणि सरकारलाही अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व घटनांमधून संजय गायकवाड हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत हे स्पष्ट होते.

Read More