Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

फाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं, 'सामना'तून टीकास्त्र

फाजील आणि उत्साही भक्तांमुळे देव, देश, धर्माचाही अपमान होत असल्याची टीका

फाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं, 'सामना'तून टीकास्त्र

मुंबई : फाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं असे टीकास्त्र शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून सोडण्यात आले आहे. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकानंतर देशभरात वाद उफळला. त्यानंतर भाजपने हे पुस्तक मागे घेतले. पण सर्व स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांना तोड नाही. पण त्यांची तुलना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे का ? याचा अर्थ एकसुरात नाही असाच आहे. अशी तुलना करणाऱ्यांना शिवजी महाराज कधी कळलेच नाही. पंतप्रधान मोदींना देखील ही तुलना आवडली नसेल असेही यात म्हटले गेले आहे. 

ज्या लोकांनी पंतप्रधान मोदींना शिवाजी म्हणून संबोधले आहे, त्यांनीच लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींना विष्णुचे तेरावे अवतार म्हटले होते. अशा लोकांमुळे देव, देश, धर्माचाही अपमान आहे. यात पंतप्रधान मोदींची कोंडी होत आहे. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक म्हणजे ढोंगी आणि चमचेगिरीचा उत्तम नमुना असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र सदनावर हल्ल चढवणाऱ्या जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या वादग्रस्त पुस्तकावर महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेने निषेध नोंदवला आहे. आता फक्त पुढाऱ्यांनी बोलायचे आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातू सपकन तलवार कढावी अशी ती आता काढली आहेत. यामुळे भाजपची तोंड म्यान झाली आहेच. 

Read More