Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होत आहेत, RSS ने त्यांना...,' राऊतांनी सांगितला मोहन भागवतांच्या विधानाचा अर्थ; 'आता देश....'

Sanjay Raut on Narendra Modi Retirement: 75 वर्षांची शाल ओढली जाते, तेव्हा त्याचा अर्थ तुमचं वय झालं आहे, आता बाजूला व्हा आणि आम्हाला करु द्या असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितल्यानंतर संजय राऊतांनी त्यांचा इशारा नरेंद्र मोदींकडे असल्याचा दावा केला आहे.   

'सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होत आहेत, RSS ने त्यांना...,' राऊतांनी सांगितला मोहन भागवतांच्या विधानाचा अर्थ; 'आता देश....'

Sanjay Raut on Narendra Modi Retirement: सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पांढरी झाली आहे, डोक्यावरील केस उडाले आहेत, जगभ्रमण करुन झालं आहे. सत्तेची सर्व सुखं उपभोगली आहेत. 75 वर्षानंतर निवृत्तीचा जो नियम केला आहे, त्यासंदर्भात संघ त्यांना वारंवार सूचना देत आहेत. तुम्हाला आता निवित्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हाती सोपवावा लागेल असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. 75 वर्षांची शाल ओढली जाते, तेव्हा त्याचा अर्थ तुमचं वय झालं आहे, आता बाजूला व्हा आणि आम्हाला करु द्या असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितल्यानंतर संजय राऊतांनी त्यांचा इशारा नरेंद्र मोदींकडे असल्याचा दावा केला आहे. 

मोहन भागवतांच्या विधानाबाद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "मी यासंदर्भात एक रोखठोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी जेव्हा प्रथम संघ मुख्यालयात गेले तेव्हा सरसंघचलाक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली याचा सारांश टाकला होता. त्यात नरेंद्र मोदींनी स्वत: किंवा संघाने जो नियम केला आहे त्याची आठवण करुन देण्यात आली. 75 वय झाल्यानंतर सत्तेच्या पदावरुन निवृत्ती स्विकारावी". आपले मार्ग मोकळे कऱण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांच्यासारख्या अनेक नेत्यांवर जबरदस्तीने आपल्या स्वार्थासाठी निवृत्ती लादली असा आरोपही राऊतांनी यावेळी केला. 

"सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पांढरी झाली आहे, डोक्यावरील केस उडाले आहेत, जगभ्रमण करुन झालं आहे, सत्तेची सर्व सुखं उपभोगली आहेत. 75 वर्षानंतर निवृत्तीचा जो नियम केला आहे, त्यासंदर्भात संघ त्यांना वारंवार सूचना देत आहेत. तुम्हाला आता नविृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हाती सोपवावा लागेल," असंही ते म्हणाले. 

अमित शाह यांनी निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार असल्याचं आणि अध्यात्माकडे वळणार असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, "कोणी काय करावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. अनेकजण आपल्या भागात सामाजिक आणि इतर कार्य कर असतात. दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभसंकेत आहेत". 

शिवसेना-मनसे पालिका निवडणूक एकत्र लढणार

"मी असं म्हणत नाही की शिवसेना मनसे एकत्र निवडणूक लढत आहे. पण एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासकरुन मुंबई महापालिका निवडणूक लढावी यासाठी लोकांचा दबाव आहे. 5 जुलैला वरळीत विजयी रॅलीत ते चित्र दिसलं आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीची स्थानिक निवडणुकीत गरज नाही. स्थानिक मुद्दे असल्याने स्थानिाकांवर सोडावं लागेल. मुंबईला वाचवायचं असेल तर राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना एकत्र येऊन निवडणूक लढावी लागेल ही लोकांची मानसिकता आणि दबाव आहे", असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांना माध्यमांशी न बोलण्याबद्दल दिलेल्या आदेशावर ते म्हणाले की, "राज ठाकरेंची काम करण्याची एक पद्धत आहे. आम्ही जाहीर बोलतो, ते बोलत नसतील. पण येणाऱ्या काळात काय होत आहे हे कळेल".

Read More