Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बेडरुममधला 'तो' व्हिडीओ कोणी काढला? संजय शिरसाटांनी केला खुलासा, 'माझ्या...'

शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते बनियानमध्ये बसले असून, समोर पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. मात्र संजय शिरसाट यांनी  फक्त वर पैसे आणि आत कपडे होते असा दावा केला आहे.   

बेडरुममधला 'तो' व्हिडीओ कोणी काढला? संजय शिरसाटांनी केला खुलासा, 'माझ्या...'

शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते बनियानमध्ये बसले असून, समोर पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. मात्र संजय शिरसाट यांनी  फक्त वर पैसे आणि आत कपडे होते असा दावा केला आहे. हा व्हिडीओ माझ्या बेडरुममधील असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. मी प्रवासातून आलो असल्याने बेडवर माझ्या कुत्र्यासह बसलो होतो. तसंच घरी असल्याने बनियानमध्ये होतो असा त्यांचा दावा आहे. 

बेडरुममधील व्हिडीओ कोणी काढला यासंदर्भात विचारलं असता, त्यांनी एखाद्या उत्साही कार्यकर्त्याने काढला असावा असं म्हणत उद्धव ठाकरेंनाही टोमणा मारला. माझं घर म्हणजे मातोश्री 2 नसून , माझ्या घरात सर्वांना प्रवेश मिळतो. एखाद्याने उत्साहासाठी व्हिडीओ काढला असेल. आमच्याकडे चिठ्ठ्या पाठवून प्रवेश दिला जात नाही. आपण कार्यकर्त्यांसाटी आहोत असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. 

दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. "हा रोमांचक व्हिडिओ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पाहावा! देशात काय चालले आहे! (महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा हा व्हिडिओ बरेच काही सांगून जातो)," असं त्यांनी व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे. 

व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर संजय शिरसाट यांनी विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं. "व्हिडीओत दिसत आहे ते माझं घर आणि बेडरुम आहे. बनियानमध्ये बसलो असून, बाजूला लाडका कुत्रा आहे. तसंच बॅग ठेवलेली दिसत आहे. याचा अर्थ मी प्रवासातून आलो आहे, कपडे काढले आहेत आणि बेडवर बसलो आहे. अरे मुर्खांनो पैशांची इतकी मोठी बॅग ठेवायची तर कपाटं काय संपलीत का? नोटा कपाटात ठेवल्या असता ना. यांना पैशांशिवाय काही दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरले असता त्यांच्या बॉडीगार्डच्या हातात पैशांच्या बॅगा असल्याचं यांना वाटत होतं. यांना कपडे ठेवायला नाहीतर पैसे ठेवायला बॅगा लागतात असं यांचं वर्तन आहे".

मी प्रवासातून आल्याने बॅग तिथे बाजूला ठेवली होती. हे मूर्खपणाचं लक्षण आहे अशी टीकाही त्यांनी केली. पण घऱाच्या बेडरुममध्ये व्हिडीओ बाहेर कसा येतो असं विचारलं असता ते म्हणाले, "आमच्याकडे मातोश्री, मातोश्री 2 नाही. माझ्या मतदासंघात घर सर्वांसाठी खुलं असतं. एखाद्याने उत्साहात व्हिडीओ काढला असेल. माझ्याकडे चिठ्ठी देऊन, काम काय, नाव काय असे प्रश्न विचारुन आत घेतलं जात नाही. कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत. बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आजही लक्षात ठेवली आहे. व्हिडीओ कोणी काढला असेल तर त्यात काही गैर नाही गैरसमजाचं कारण नाही". 

आमच्या बॅगा पाहण्यापेक्षा आपलं चारित्र्य पाहा. जाणुनबुजून टार्गेट करणाऱ्यांना मी उत्तर देऊ शकतो याची कल्पना आहे. पण माझ्यावर काही परिणाम होत नाही असंही ते म्हणाले. मी गाडीत बसल्यावर, कधी गाडीत बसल्यावर सगळ्या ठिकाणी व्हिडीओ काढत असतात. त्यावर काही आक्षेप असण्याचं कारण नाही असंही त्यांनी सांगितलं. 

पैशांच्या बॅगा अशा दरवाजाजवळ ठेवल्या जात नाही आणि कोणी व्हिडीओ काढत नाही. असं केल्याने आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले. या व्हिडीओत काही तथ्य नाही असा त्यांचा दावा आहे. 

"संजय राऊतांना हात पाय बांधून रुग्णालयात नेण्याची वेळ"

"संजय राऊतांनी आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलं आहे. ते संताजी धनाची दिसतात का काय असा प्रश्न वाटतो. अशी मूर्खासारखी विधानं करणं फक्त त्यांनाच जमू शकतं. जे काही त्यांना टोचलं आहे त्याची जखम आजही भळभळत आहे. त्यामुळे त्यांना नेहमी एकनाथ शिंदे दिसतात. एकनाथ शिंदेंमुळे त्यांची गेलेली सत्ता आजही स्वस्थ बसू देत नाही. सगळ्या वल्गना केल्यानंतर ज्या ठिकाणी मोदी, अमित शाह असणाऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे दिसले की बंद दाराआड चर्चा, लाचारी अशा गोष्टी रचल्या जातात. त्यातील आज एक मळमळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. संजय राऊतांसारख्या वेड्या माणसासाठी आम्ही ठाण्याच्या रुग्णालयात बेड ठेवला आहे. पण आता त्यांचे हात पाय बांधून रुग्णालयात नेण्याची परिस्थिती आली आहे".

Read More