Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'मी कपडे काढून, बेडवर...', संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' बेडरुम व्हिडीओमागचं सत्य; 'कपाटात पैसे...'

Sanjay Sirsat on Viral Video: आमच्या बॅगा पाहण्यापेक्षा आपलं चारित्र्य पाहा. जाणुनबुजून टार्गेट करणाऱ्यांना मी उत्तर देऊ शकतो याची कल्पना आहे अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.   

'मी कपडे काढून, बेडवर...', संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' बेडरुम व्हिडीओमागचं सत्य; 'कपाटात पैसे...'

Sanjay Sirsat on Viral Video: शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी व्हायरल व्हिडीओवरुन आरोप होऊ लागल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बॅगेत फक्त पैसे होते हा दावा फेटाळून लावला. पैशांच्या बॅगा अशा दरवाजाजवळ ठेवल्या जात नाहीत आणि कोणी व्हिडीओ काढत नाही. असं केल्याने आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले. या व्हिडीओत काही तथ्य नाही असा त्यांचा दावा आहे. 

"व्हिडीओत दिसत आहे ते माझं घर आणि बेडरुम आहे. बनियानमध्ये बसलो असून, बाजूला लाडका कुत्रा आहे. तसंच बॅग ठेवलेली दिसत आहे. याचा अर्थ मी प्रवासातून आलो आहे, कपडे काढले आहेत आणि बेडवर बसलो आहे. अरे मुर्खांनो पैशांची इतकी मोठी बॅग ठेवायची तर कपाटं काय संपलीत का? नोटा कपाटात ठेवल्या असत्या ना", असा टोला त्यांनी लगावला. 

पुढे ते म्हणाले, "यांना पैशांशिवाय काही दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरले असता त्यांच्या बॉडीगार्डच्या हातात पैशांच्या बॅगा असल्याचं यांना वाटत होतं. यांना कपडे ठेवायला नाहीतर पैसे ठेवायला बॅगा लागतात असं यांचं वर्तन आहे," अशी टीकाही त्यांनी केली. 

मी प्रवासातून आल्याने बॅग तिथे बाजूला ठेवली होती. हे मूर्खपणाचं लक्षण आहे अशी टीकाही त्यांनी केली. पण घऱाच्या बेडरुममध्ये व्हिडीओ बाहेर कसा येतो असं विचारलं असता ते म्हणाले, "आमच्याकडे मातोश्री, मातोश्री 2 नाही. माझ्या मतदासंघात घर सर्वांसाठी खुलं असतं. एखाद्याने उत्साहात व्हिडीओ काढला असेल. माझ्याकडे चिठ्ठी देऊन, काम काय, नाव काय असे प्रश्न विचारुन आत घेतलं जात नाही. कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत. बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आजही लक्षात ठेवली आहे. व्हिडीओ कोणी काढला असेल तर त्यात काही गैर नाही गैरसमजाचं कारण नाही". 

आमच्या बॅगा पाहण्यापेक्षा आपलं चारित्र्य पाहा. जाणुनबुजून टार्गेट करणाऱ्यांना मी उत्तर देऊ शकतो याची कल्पना आहे. पण माझ्यावर काही परिणाम होत नाही असंही ते म्हणाले. मी गाडीत बसल्यावर, कधी गाडीत बसल्यावर सगळ्या ठिकाणी व्हिडीओ काढत असतात. त्यावर काही आक्षेप असण्याचं कारण नाही असंही त्यांनी सांगितलं. 

"संजय राऊतांना हात पाय बांधून रुग्णालयात नेण्याची वेळ"

"संजय राऊतांनी आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलं आहे. ते संताजी धनाची दिसतात का काय असा प्रश्न वाटतो. अशी मूर्खासारखी विधानं करणं फक्त त्यांनाच जमू शकतं. जे काही त्यांना टोचलं आहे त्याची जखम आजही भळभळत आहे. त्यामुळे त्यांना नेहमी एकनाथ शिंदे दिसतात. एकनाथ शिंदेंमुळे त्यांची गेलेली सत्ता आजही स्वस्थ बसू देत नाही. सगळ्या वल्गना केल्यानंतर ज्या ठिकाणी मोदी, अमित शाह असणाऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे दिसले की बंद दाराआड चर्चा, लाचारी अशा गोष्टी रचल्या जातात. त्यातील आज एक मळमळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. संजय राऊतांसारख्या वेड्या माणसासाठी आम्ही ठाण्याच्या रुग्णालयात बेड ठेवला आहे. पण आता त्यांचे हात पाय बांधून रुग्णालयात नेण्याची परिस्थिती आली आहे".

Read More