दिल्लीत शितजंय मोठं राजकारण
दिल्लीत शितजंय मोठं राजकारण
Shivsena Thackeray Group on PM Modi1`s Visit to Manipur : पाकिस्तानकडून दहशतवादी (Indian Pakistan Tension) कारवायांना दिला जाणारा पाठिंबा पाहता या शेजारी आणि कटकारस्थानं रचणाऱ्या देशाला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हाती घेत दहशतवादी तळ उध्वस्त केले. केंद्राच्या या भूमिकेचा पाठिंबा देत विरोधी पक्षांनीही यावेळी सत्ताधाऱ्यांची साथ देत देशासाठी एकजुट दाखवून दिली. मात्र त्यानंतर सुरू असणारा उत्साही जल्लोष पाहून मात्र आता पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेवर नाराजीचा तीव्र सूर आळवण्यास सुरुवात केली आहे.
दिल्लीत मोठं राजकारण सुरू असून त्याचसंदर्भा ठाकरेंच्या शिवसेनेनं 'सामना' या त्यांच्या मुखपत्रातून अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मणिपुरात (Manipur) राष्ट्रपती राजवट लागू असल्याचं म्हणत ही राजवट दूर करून तिथं सरकार स्थापन करायचं आणि मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्यास ('सिंदूर उत्सवा'स) पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने उपस्थित राहायचं अशा राजकीय खेळीचा बेच थेट दिल्लीपासून ते अगदी मणिपूरच्या राजभवनात शिजत आहे ही गंभीर बाब ठाकरेंच्या शिवसेनेनं उजेडात आणली आहे.
पंतप्रधान मोदी आता मणिपुरात जाऊन भाजपचं राजकारण यशस्वी करण्यासाठीच ते तिथं असतील आणि हा सर्व प्रकार राजकीयदृष्ट्य घृणास्पद आहे, असा घणाघात शिवसेनेनं (ठाकरे) केला आहे. पंतप्रधान मणिपुरात जाऊ शकतात, पण फक्त एका एका राजकीय उत्सवात भाग घेण्यासाठी... असं म्हणत किमान शब्दांत सत्ताधाऱ्यांवर सामनातून कटाक्ष टाकण्यात आला आहे.
सिंदूर यात्रेआधी राममंदिर प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं घराघरात पोहोचलेल्या अक्षता, त्याआधी गावोगाव पोहोचलेलं गंगाजल यासारख्या गोष्टींचा संदर्भ देत हे असे भावनिक कार्यक्रम राबवून मूळ प्रश्नांवरून आणि मुद्द्यांवर सामान्य जनतेचं लक्ष उडवण्याचा प्रकार चालू आहे असा गंभीर आरोपही ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
पंतप्रधानांना आतापर्यंत मणिपुरात जाण्यासाठी वेळ मिळाला नाही मात्र आता ते तिथं अत्याचारग्रस्त, अन्यायग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी नव्हे, तर मणिपुरात भाजप मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण उत्सवास मोदी उपस्थित राहतील, हेच अधिक स्पष्टपणे दिसत आहे, अशा शब्दांत ठाकरेंच्या शिवसेनेनं या भूमिकेवर टीका केली.
महाराष्ट्रात जसं बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारची स्थापना गृहखात्याच्या मदतीने झाली तोच खेळ मणिपुरात यशस्वी व्हायला आता कोणतीच अडचण दिसत नाही, असं म्हणत भाजपच्या राजकारणावर टीकेची झोड उठवण्यात आली.