भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोक आमच्याच पैशांवर जगतात असं वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्राकडे ना खाणी आहेत ना उद्योगधंदे अशापद्धतीने वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदारावर उद्धव ठाकरेंनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.
'त्यांच्या बुडाला आग लागणं हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे त्यांची लायकी नसतानाही बोलत असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत मराठी माणसासोबत इतर भाषिक गुणा गोविंदाने रहात आहेत. हे पाहून भाजपच्या बुडाला आग लागली आहे. दुबेसारखे लकडबग्गे म्हणजे तरस आहे. ज्यांची लायकी नसताना ते बोलत आहेत. असल्या विधानांमधून आग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हिंदी ही राज्य भाषा आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध नाहीच. राज्यभाषेसाठी जे जे लागेल ती मदत करु. पण हिंदी सक्तीला आमचा विरोध असल्याच यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना शिवसैनिक जातपात धर्म न बघता मदत करत आहेत, हे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पहलगाम अतिरेकींसोबत मराठी माणसाची तुलना करत आहे. त्यामुळे आता मराठी माणसाने आपल्या न्यायासाठी हक्कासाठी लढणं आवश्यक आहे. पण दहशतवाद्यांसोबत तुलना करताना ते अतिरेकी भाजपमध्ये गेले का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. मराठी माणसांची तुलना पेहलागमच्या अतिरेक्यांशी करत आहेत ते खरे मराठीचे मारेकरी हे हिंदूंनाही वाचवू शकत नाही मराठीवर अन्याय करणार्यांची बाजू घेत आहेत.
मूळभाजपा ज्यांची शिवसेनेसोबज युती होती तो पक्ष मेलेला आहे. त्याला मारून टाकल आहे. आताच्या भाजपने उर बडवे घेतले आहेत या पक्षातून त्या पक्षातून लोकं घेत आहे. आम्ही एकत्र आल्याने महाजन याच्या सारख्या लोकांच्या बुडाला आग लागली आहे. असं देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.