Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सोलापूरमध्ये शिवशाही बसला भीषण अपघात, १ ठार १० जखमी

ही धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला.

सोलापूरमध्ये शिवशाही बसला भीषण अपघात, १ ठार १० जखमी

सोलापूर: सोलापूरच्या शेटफळ फाट्याजवळ शुक्रवारी शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून १० जण जखमी आहेत. मल्लिकार्जुन आबुसे असे मृत प्रवाशाचे नाव आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, ही शिवशाही बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात होती. पहाटे चार वाजता शेटफळ फाट्याजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला. यामध्ये मल्लिकार्जुन आबुसे जागीच ठार झाले. तर इतर १६ प्रवाशी जखमी झाले. 

या सगळ्यांवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, एसटी प्रशासनाने जखमींना प्रत्येकी १ हजार, तर मयत मल्लिकार्जुन आंबुसे यांच्या कुटुंबीयांना १० हजार रुपयांची मदत दिली आहे. 

Read More