Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक, ४४ वर्षीय महिलेवर पाच जणांकडून अत्याचार

धक्कादायक, ४४ वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.  

धक्कादायक, ४४ वर्षीय महिलेवर पाच जणांकडून अत्याचार

अकोला : शहरातील एमआयडीसी भागातील कैलास नगरात रहाणाऱ्या ४४ वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास येवता मलकापूर मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या खदानीत घडली. 

महिला एका हॉटेलात भांडी धुण्याचे काम करीत होती. याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. ही बाब मुलाच्या घरच्यांना समजली आणि मुलाच्या भावाने या महिलेस आपल्या भावासोबत तुझे लग्न लावून देतो म्हणून सोबत नेत तिच्यावर मित्रांच्या सहाय्याने अत्याचार केला. 

सध्या पीड़ित महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी शिवणी भागातील रहिवासी असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Read More