Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! नराधम पित्याकडून पोटच्या मुलीची अमानुष हत्या

Father Kills Daughter : जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली आहे. हा संताजनक प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. 

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! नराधम पित्याकडून पोटच्या मुलीची अमानुष हत्या

'मीच गळा दाबून तिला पुरलं' हे शब्द एका बापाचे आहेत. ज्याने आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून आत्महत्या केल्याचा क्रूरप्रकार समोर आला आहे. बापानेच आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. एवढ्यावरच हा नराधम बाप थांबला नाही त्याने मुलीचा मृतदेह पुरला आणि मुलीचा मृत्यू झाल्याच बनाव रचला आहे. 

श्रावणी ओगसिद्ध कोठे असं मृत मुलीचं नाव आहे. श्रावणी आपल्या वडिलांसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर गावात राहत होती. आरोपीला तीन मुली आणि एक मुलगा आहे. तर पत्नी सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहे. दोन मुली व मुलगा आजोळी होते. 

श्रावणी आपल्या वडिलांसोबतच राहत होती. नराधम बापाने आपले अनैतिक संबंध उघड होवून समाजात बदलानी होऊ ये या विचाराने श्रावणीचा गळा दाबला. आपल्या पोटच्या मुलीला फिट आल्याचे भासवून तिचा मृत्यू झाल्याच बापाने भासवलं. 

गळा दाबून श्रावणीचा मृतदेह घरासमोर बांधकामासाठी खणलेल्या खड्याच पुरुन  पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103,238 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.  

नेमक काय घडलं? 

घटनेच्या दिवशी मयत श्रावणी वडिलांजवळ झोपण्यासाठी गेली होती. त्यानंतर रात्री आरोपीने तिचा गळा दाबून हत्या केली. एवढंच नव्हे मृतदेह घराजवळील खड्ड्यात पुरला. शुक्रवारी सकाळी आजोबा रेवणसिद्ध कोठे यांनी नात श्रावणीची चौकशी केली. गावात आणि आजोळी शोध घेतला पण काही माहिती मिळाली नाही.

तेव्हा नातलगांना लक्षात आलं की, घराशेजारील खड्ड्यात नव्याने माती टाकलेली दिसली. तसेच चिखलात पावलांचे ठसे देखील तिथे आढळले यावर गावकऱ्यांचा संशय वाढला. 

Read More