नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील केडगावमध्ये घडलीये... अवधूत मेंगवडे असं मृत बाळाचं नाव आहे...क्षुल्लक कारणावरुन सचिन मेंगवडे याचं त्याची पत्नी पल्लवी हिच्याशी वाद झाला.. या वादात रागाच्या भरात पल्लवीनं सचिनवर त्रिशूळ फेकून मारला.. मात्र तो त्रिशूळ थेट 11 महिन्यांच्या बाळाच्या डोळ्यात शिरला आणि तडफडून या बाळाचा जागीच मृत्यू झाला.. या प्रकरणी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटकही झालीये.. मात्र त्यांच्या घरात त्रिशूळ आला कुठून हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.