Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'मी बायकोवर चाकूचे वार करुन आलोय...'; ज्योतिबाच्या घाटात बायकोची गळा चिरून हत्या; पती पोलिस ठाण्यात हजर

कोल्हापूरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीने निर्जनस्थळी चाकूने वार करुन पत्नीला ठार केलं. या हत्येमागचं कारण काय?

'मी बायकोवर चाकूचे वार करुन आलोय...'; ज्योतिबाच्या घाटात बायकोची गळा चिरून हत्या; पती पोलिस ठाण्यात हजर

कोल्हापूर परिसरातील ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जनस्थळी चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर परिसरातील जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जनस्थळी चाकूने वार करून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार केले. त्यानंतर आरोपी पतीने सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशन गाठत खुनाची हकिकत सांगितली. 

 चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार केले. त्यानंतर आरोपी पतीने आज सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशन गाठत खुनाची हकिकत सांगितली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पतीला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
34 वर्षीय सचिन चंद्रशेखर राजपूत याने चारित्र्याच्या संशयावरून 28 वर्षीय पत्नी शुभांगीचा खून केल्याचे सांगितले.

आरोपी सचिन हा बागलकोट जिल्ह्यातील असून तो अहमदाबाद येथे भारतीय सैन्यदलात 8 वर्षे होता. त्याने एका महिलेसोबत अश्लील वर्तन केलेच्या कारणावरून त्याला सैन्यदलातून बडतर्फ केले होते. तो मोटारसायकलवरून सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आला. मी कोल्हापूर येथून आलो असून, मी माझ्या पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद करून आलो असल्याचे सांगितले. फौजदार चावडी पोलिसांनी लागलीच कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून विचारणा केली. शुभांगी आणि सचिन दोघे जण गप्पा मारत बसले होते. यावेळी शुभांगी बेसावध असताना सचिनने शुभांगीच्या चेहरा, गळा आणि पोटावर चाकूने वार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.यामध्ये संबंधित पत्नीचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

Read More