Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अजून बाहेर का येईना म्हणत कुटुंबाने तोडलं दार, कोकणात उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या; कारण.....

कोकणातील अतिशय धक्कादायक प्रकार. तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 

अजून बाहेर का येईना म्हणत कुटुंबाने तोडलं दार, कोकणात उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या; कारण.....

प्रणव पोळेकर, रत्नागिरी, झी मीडिया : अलीकडे आत्महत्या करण्याचे प्रमाण युवकांमध्ये वाढले आहे ही बाब चिंताजनक आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील उच्चशिक्षण घेत असलेल्या असलेल्या युवकाने शौचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.ओवेस जुलफीकार मुल्ला (वय २२) असे या युवकाचे नाव आहे मात्र आत्महत्या करण्यामागील नेमकं कारण अद्यापही समोर आलेले नाही मात्र त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ओवेसचे वडील डॉ. जुलफीकार जमीर मुल्ला हे चिपळूणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करातात हे कुटुंब चिपळूण शहरातील वाणी अळी येथे एकता अपार्टमेंटमध्ये राहते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ओवेस घरातील शौचालयात गेला, मात्र तो खूपवेळ वेळ झाला तरी बाहेर आला नव्हता त्यामुळे कुटुंब चिंतेत पडले. अखेर दरवाजा तोडून आत पाहिल्यावर ओवेसने लोखंडी ग्रीलला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या सगळ्याची माहिती तात्काळ चिपळूण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटना धाव घेत या सगळ्याचा पंचनामा केला. आकस्मिक मृत्यू म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास चिपळूण शहरात घडला अशी माहिती चिपळूण पोलिसांनी आज दिली आहे.

ओवेस हा फार्मसीचे शिक्षण घेत होता. उच्च शिक्षण घेत असताना सगळे व्यवस्थित सुरू असतानाही त्याने नेमके कोणत्या कारणाने हे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप समजू शकलेलं नाही. ओवेसच्या मृत्यूमुळे चिपळूण शहर परिसरातून हळहळ व्यक्त केले जात आहे. या कुटुंबावरही दुःखाचा मोठा डोंगर घुसला आहे.चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या आत्महत्या प्रकरणाच्या पुढील तपास चिपळूण पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करीत आहेत.

Read More