Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक प्रकार! शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर चढल्या मुंग्या अन्...

वर्ध्यात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर मुंग्या चढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील हा प्रकार आहे. 

धक्कादायक प्रकार! शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर चढल्या मुंग्या अन्...

 वर्ध्याच्या हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर मुंग्याच मुंग्या चढल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आंतररुग्ण वॉर्डमध्ये भरती ठेवल्यानंतर सदर घटना घडली.  शस्त्रक्रिया करण्यात आली,यावेळी सदर व्यक्ती सुंगणी दिल्याने बेशुद्ध अवस्थेत होता. नजीकच्या चिचघाट (लाडकी) येथील रुग्णावर रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला पुरुष आंतररुग्ण वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्याचे सर्वांगावर मुंग्या चढल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्या सोबतच्या मित्राने याची माहिती वार्डमधील उपस्थित कर्मचाऱ्यास दिली. रुग्णाला शस्त्रक्रिया कक्षात नेऊन पुन्हा तपासणी करण्यात आली आणि मुंग्या काढून टाकल्यानंतर रुग्णाची स्वच्छता करण्यात आली..शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे शरीरावर मुंग्यांचा मोठ्या प्रमाणात प्रकोप झाल्याचे घटनेने रुग्णालयाच्या स्वच्छतेवर तसेच रुग्णांच्या काळजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

रुग्णालयाच्या परिसरात मुंग्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. यासोबतच हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव दिसून येतो.संबंधित घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. तपासात कोणी दोषी आढळल्यास कारवाईसुध्दा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. 

Read More