Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

विरार हादरलं! सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं; होळीसाठी लाकडं गोळा करत असताना...

Shocking News From Virar: होळीची लाकडं आणण्यासाठी स्थानिक गावकरी जंगलात गेले असता त्यांना एक सुटकेस सापडली.

विरार हादरलं! सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं; होळीसाठी लाकडं गोळा करत असताना...

Shocking News From Virar: विरारमधील मांडवी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचं मुंडकं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील कणेर पोलीस चौकीअंतर्गत येणार्‍या परिसरात एका बंद सुटकेसमध्ये महिलेचे मुंडके आढळून आलं आहे. या घटनेचं वृत्त वाऱ्यासारखं पसरल्यानंतर विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

होळीची लाकडं गोळा करण्यासाठी जंगलात गेलेले स्थानिक

समोर आलेल्या माहितीनुसार, विरार फाटा येथील पिरकुंडा दर्गाजवळ होळी निमित्ताने स्थानिक ग्रामस्थ लाकडे आणण्यासाठी रानात गेले होते. रानात होळीची लाकडं गोळा करत असताना या गावकऱ्यांना एक मोठी सुटकेस आढळून आली. या सुटकेसमध्ये एका महिलेचे मुंडकं असल्याचं समजल्यानंतर मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेचे मुंडके असलेली ही सुटकेस ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला आहे. 

महिलेची ओळख पटलेली नाही

प्राथमिक तपासानुसार महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ते सुटकेसमध्ये घालून आरोपींनी त्याची विल्हेवाट लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजूनही तिची पूर्ण ओळख समोर आलेली नाही. या महिलेची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या महिलेचं मुंडकं पोलिसांना मिळालं आहे. या महिलेच्या मृतदेहाचे इतर अवयव किंवा भाग आरोपींनी जंगलात फेकले आहेत की त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांकडून सध्या उर्वरित मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. 

खळबळ उडाली

होळीचा सण सर्वत्र साजरा होतं असताना महिलेचे मुंडके आढळून आल्याने या घटनेनं विरार पूर्व भागात खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी का आणि कशासाठी करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेबाबत पोलीस अधिक तापस करीत आहेत.

Read More