सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्रशान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर संपूर्ण कुटुंबाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं अशी कुजबूज होताना दिसत आहे.
या घटनेमध्ये दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५) व काजल समीर पाटील (वय ३०) असं या सासू-सुनांचे नावे आहेत,तर अल्लाउद्दीन पाटील व समीर पाटील या दोघा बाप लेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
नांगोळे गावांमध्ये ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचं घर आहे.सकाळच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे,या घटनेनंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरु केला आहे,मात्र हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून झाला आहे,हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.तर याबाबत पोलीस तपास करत असून या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी दुपारीही सर्व जण एकाच घरात असताना सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न झाला. सून काजल समीर पाटील, वय 30, आणि सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील, वय 45, या दोघींचा जागीच मृत्यू झाला; तर अल्लाउद्दीन आणि समीर या दोघांनाही बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्लाउद्दीन यांचा शेती व्यवसाय आहे. पण एवढं टोकाचं पाऊल का उचललं अशी सगळीकडे चर्चा आहे.