Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक ! नवऱ्यानं दुसरं लग्न केलं म्हणून महिलेने पोराला पिशवीत कोंबलं

 दामिनी पथकाच्या तत्परतेचं कौतुक

धक्कादायक ! नवऱ्यानं दुसरं लग्न केलं म्हणून महिलेने पोराला पिशवीत कोंबलं

पुणे : नवऱ्यानं दुसरं लग्न केलं म्हणून पोटच्या पोराला एका महिलेने अक्षरशः पिशवीत कोंबल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. यात पोलिसांच्या दामिनी पथकाने तातडीने हालचाल करत लहानग्याचे प्राण वाचवले आहेत. दामिनी पथकाला या प्रकाराबाबत कॉल येताच तातडीने हडपसरच्या मंतरवाडी चौकात दाखल झालं आणि तिथं नशेत असलेल्या महिलेच्या हातातून पिशवी घेत त्यातून बाळाची सुटका केली. 

पिशवीत कोंबल्यामुळे बाळाची अवस्था अत्यंत खराब होती मात्र महिला पोलिसांनी त्या बाळाला स्वच्छ केलं आणि महिलेसह बाळाची आरोग्य तपासणी करून महिलेच्या भावाकडे सोपवलं. दामिनी पथकाच्या तत्परतेचं आणि संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

Read More