Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमावर ३५० सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

कोरेगाव भीमात १ जानेवारी २०१८ रोजी उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर...

शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमावर ३५० सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

कोरेगाव भीमा, पुणे : कोरेगाव भीमा इथे १ जानेवारीला विजयस्तंभावर २०२ व्या शौर्यदिवसा निमित्तानं देशभरातून असंख्य भाविक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणार असल्याने परिसरात शांतता व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या परिसरात ३५० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसंच १० ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. कोरेगाव भीमा येथे मागील दोन वर्षांपूर्वी विजयस्तंभ परिसरात दंगलीचे स्वरुप येऊन काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले होते. त्यामुळे या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून शासकीय पातळीवर सर्व शायकिय यंत्रणा कोरेगाव भीमा, पेरणेफाटा येथे ठाण मांडून आहेत. शासकिय यंत्रणेतून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. याच परिसरात सर्व कॅमेरांचे चित्रिकरण कंट्रोल रुमला जोडले असून त्या ठिकाणावरूनदेखील नजर ठेवली जाणार आहे.

अधिक वाचा - राव यांच्याकडच्या 'त्या' हार्ड डिस्कमध्ये काय? एफबीआय शोधणार

 

पोलिसांची करडी नजर 

शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोशल मीडियावरती आता करडी नजर आहे. कोरेगाव भीमा, शिक्रापूर, सणसवाडी, पेरणेफाटा, लोणीकंद या परिसरातून कुठल्याही पद्धतीने सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुपवर कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट आली आणि ती पोलिसांच्या निदर्शनास आली तर अशा प्रत्येक ग्रुप ऍडमिनवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिक्रापूर व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल २५० ग्रुप ऍडमिनला पोलिसांकडून तशा लेखी नोटीसही देण्यात आल्या आहेत. १ जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस ही काळजी घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून इन्स्टाग्राम, टिकटॉक, हॅलो ऍप आदींसह फेसबुक-व्हॉट् सऍपच्या राज्यातील सर्व सोशल मीडिया ग्रुपवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. सर्वात आधी ग्रुप ऍडमिनला अटक करून त्यावर आयटी ऍक्टनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.

Read More