मुंबई : दहीहंडीच्या उत्सवानिमित्त राज्यभर ठिकठिकाणी दहीहंड्या आयोजित करण्यात आल्या होत्या. आयोजकांनी कलाकारांनाही आमंत्रित केलं होतं. यामध्ये ठाणे टेंभीनाका इथली दहीहंडी राज्यभर चर्चेत राहिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभी नाका इथे दहीहंडी सुरू केली होती. या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही हजरी लावली होती. यावेळी श्रद्धाने ठाणेकरांसोबत मराठीमध्ये संवाद साधला.
काय म्हणाली श्रद्धा कपूर?
तुम्हा सर्व ठाणेकरांना नमस्कार..., दहीहंडीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत, यापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे...? दिघे साहेबांची दहीहंडी खूप मोठी असते, हे नेहमीच ऐकलंय, पण आज ते प्रत्यक्षात पाहिलं. तुम्ही मला इतकं प्रेम देता त्यासाठी मी तुमची आभारी आहे.
Soooooooo cute & adorable!
— Nirmal Kumar (@nirmal_indian) August 19, 2022
Even her voice is so cute. #ShraddhaKapoor #Maharashtra #Thane #dahihandi2022#happyjanmashtami pic.twitter.com/ToKJ6ykgts
श्रद्धा कपूरच्या भाषणाची चर्चा असून तिचा या काही मिनिटांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रद्धाचं आडनाव जरी कपूर असलं तरी तिने मराठीमध्ये भाषण केलं. त्यांची आई कोल्हापूरे असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. यावर, मी तर मराठीच असल्याचं श्रद्धा म्हणाली. मराठीमध्ये भाषण केलेल्या श्रद्धाच्या व्हिडीओवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आले आहेत.