Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अनुराधाच्या हत्येनंतर पतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

महिन्यापूर्वी व्यक्त केलेली भीती दुर्दैवाने खरी ठरली

अनुराधाच्या हत्येनंतर पतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

सोलापूर : सोलापुरातील मंगळवेढ्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवेढा गावातील बहुचर्चीत अनुराधा बिराजदार हिच्या हत्येनंतर आता तिच्या पतीचा मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अनुराधाचा मृतदेह जाळण्यात आला त्याच ठिकाणी तिचा पती श्रीशैलचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे श्रीशैलची हत्या झाली की त्यानं आत्महत्या केली या संदर्भात शंका उपस्थित होते आहे.

अवघ्या महिन्यापूर्वी श्री शैल यांनी आपल्या पत्नीच्या विरहात बोलताना व्यक्त केलेली ही भीती दुर्दैवाने खरी ठरली आहे. मंगळवेढातील बहुचर्चित अनुराधा बिराजदारच्या हत्येनंतर तिला जिथे जाळण्यात आलं, त्याचठिकाणी तिचा पती श्री शैलचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे श्रीशैलची हत्या झाली की त्यानं आत्महत्या केली ही शंका उपस्थित होते आहे. 

संबधित बातमी: ...म्हणून आई-वडिलांनीच मुलीला विष देऊन जाळलं

१ ऑक्टोबर रोजी मंगळवेढा सरकोली बुद्रुक गावात अनुराधा बिराजदार या तरुणीनं सालगड्याच्या मुलासोबत लग्न केलं होतं. डॉक्टर होणाऱ्या मुलींनं आपल्या इच्छेविरोधात लग्न केल्यानं तिचे आई-वडिल संतप्त झाले आणि त्यांनी सहा जणांच्या मदतीनं तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेतात जाळून टाकला. आणि हे सगळं प्रकरण समोर आले.  अनुराधाला विष देऊन जाळल्याची श्रीशैलची पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिस तपास सुरु झाला. 

ऑनर किलींगचा हा प्रकार आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी झी २४ तासशी बोलताना ही माहिती दिली. ज्या ठिकाणी तिचा मृतदेह जाळण्यात आला त्याच ठिकाणी तिचा पती श्रीशैलचा मृतदेह संशयास्पद रित्या सापडलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीये.. पण या निमित्तानं आतातरी पोलीस योग्य दिशेने तपास करतील का हा प्रश्न विचारला जातो आहे.

Read More