सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ कारने अचानक पेट घेतल्याने कारमधील महिला जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. आंबोलीतून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या वॅगनॉर कारने अचानक आंबोली घाटात पेट घेतला. कारने पेट घेतल्यानंतर कारमध्ये अडकलेल्या महिलेला बाहेर पडता न आल्याने तिचा जळून मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग | आंबोली घाटात कारने अचानक पेट घेतला
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 18, 2020
कारमध्ये अडकलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू
आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळील घटनाhttps://t.co/7va86JWkAh
आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्याजवळ ही घटना घडली. पती-पत्नी कारने प्रवास करत होते. पती गाडी चालवत होता. मात्र, कारने अचानक पेट घेतल्याने नवऱ्याने गाडीतून उडी मारली. मात्र कार लॉक झाल्याने महिलेचा होरपळून मृत्यू झाला. कार चालकाने गाडीतून उडी मारल्याने तो जखमी झाला आहे. त्याला सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.