Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सिंधुदुर्गात लवकरच बीच वेडिंग संकल्पना सुरु होणार

बीच वेडिंगची वाढती क्रेझ

सिंधुदुर्गात लवकरच बीच वेडिंग संकल्पना सुरु होणार

सिंधुदुर्ग : एमटीडीसीकडून लवकरच सिंधुदुर्गात बीच वेडिंग संकल्पना सुरू केली जाणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास सिंधुदुर्गात नवे टुरिस्ट डेस्टिनेशन निर्माण होणार आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतात देखील बीच वेडिंगची वाढती क्रेझ आहे.

सध्या परदेशात तसेच भारतातील समुद्र किनारी खासगी हॉटेल्स आणि रिसॉर्ट मार्फत बीच वेडिंगची सुविधा पुरवली जाते. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ राज्यात विशेष करून कोकणात पर्यटकांसाठी आदरातिथ्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करत असते. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीच विडिंग पॅकेज सुविधेची भर पडणार आहे. 

देवगड तालुक्यातील मिठबाव इथे पर्यटन महामंडळाद्वारे नव्याने एक तारांकित हॉटेल उभारण्यात आलं आहे. याच ठिकाणी ही सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती एमटीडीसी प्रकल्प अधिकारी दीपक माने यांनी दिली आहे.

Read More